All About The Potential New Pandemic Virus X Disease:
युनायटेड किंगडममध्ये, शास्त्रज्ञ सध्या 'Disease X' नावाने ओळखल्या जाणार्या एका गूढ घटकामुळे उद्भवणार्या संभाव्य साथीच्या रोगाच्या भीतीने लस विकसित करण्यावर काम करत आहेत.
यावेळी संशोधक लस निर्मिती करताना आशा विषाणूंवर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यांच्याद्वारे माणसांमध्ये रोग पसरू शकतात.
युनायटेड किंगडम (United Kingdom) सरकारच्या अखत्यारीतील पोर्टन डाउन येथे असलेल्या विशेष प्रयोगशाळेत सध्या 200 हून अधिक शास्त्रज्ञ विविध चाचण्या करत आहेत.
त्यांच्या या चाचण्यांमध्ये 100 पेक्षा जास्त वेगळ्या विषाणूंचा समावेश आहे. ज्यात ते या विषाणूंवर सातत्याने देखरेख करत आहेत.
क्षयरोग आणि मंकीपॉक्स (Monkeypox) यांसारख्या आजारांवर लक्ष केंद्रित करून सांभाव्य रोगाचा अभ्यास करणे हे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे.
"Disease X" हा शब्द संभाव्य रोग जनकांचा शोध आणि त्यांच्या उत्पत्तीच्या सभोवतालच्या अनिश्चिततेचे प्रतीक आहे, जे पुढील साथीच्या रोगास उत्तेजन देऊ शकते.
कोणत्या प्राण्यातील विषाणूमुळे पुढील मोठे आरोग्य संकट उद्भवू शकते याबद्दल शास्त्रज्ञ अनिश्चित असल्याने, ते या अनाकलनीय रोगाचा उल्लेख "Disease X" म्हणून करतात.
ही संकल्पना 2018 च्या उत्तरार्धात उदयास आली जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO), सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वात धाकादायक असलेल्या आजारांची यादी जाहीर केली होती.
यामध्ये खालील रोगांचा समावेश होता;
1.कोविड-19 (Covid-19)
2. क्रिमियन-कॉंगो रक्तस्रावी ताप
3. इबोला आणि मारबरी व्हायरस
4. लस्सा ताप
5. मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनाव्हायरस (MERS-CoV) आणि गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (SARS)
6. निपाह आणि हेनिपावायरल रोग
7. रिफ्ट व्हॅली ताप
8. झिका (Zika)
9. Disease X
"Disease X" हे WHO ने सांभाव्य महामारी टाळण्यासाठी आखलेला नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. ज्यातून या रोगांसाठी उपचार पद्धती, त्याच्यावरील औषधे आणि रोगाचा प्रभाव कमी ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
सोप्या भाषेत, "Disease X" ही एक सैद्धांतिक आजार म्हणून कल्पना केली जाऊ शकते. जी मानवांना संक्रमित करण्यासाठी प्रजातींचे अडथळे ओलांडण्यास सक्षम असलेल्या विषाणूपासून उद्भवते.
"Disease X" चा प्रसार माकड आणि कुत्र्यांसह कोणत्याही प्राण्यापासून मानवांमध्ये होऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.