Terrorist
Terrorist Dainik Gomantak
ग्लोबल

Somalia: मोगादिशूमधील हयात हॉटेलवर अल-शबाबचा हल्ला, दोन सुरक्षा अधिकारी जखमी

दैनिक गोमन्तक

Al-Shabaab: अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी सोमालियातील मोगादिशू येथील हॉटेलवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन सुरक्षा अधिकारी जखमी झाले असून काही लोक ठार झाल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील हयात हॉटेलमध्ये हा हल्ला झाला. सुरक्षा सूत्रांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अल-शबाबच्या आतंकवाद्यांनी शुक्रवारी सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हयात हॉटेलवर हल्ला केला, ज्यामध्ये काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी जबरदस्तीने हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि उपस्थितांवर बेछूट गोळीबार केला.

दरम्यान, सुरक्षा अधिकारी अब्दुकादिर हसन यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, 'हयात हॉटेलवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. दहशतवादी अजूनही इमारतीत लपून बसले आहेत.' हसन पुढे म्हणाले, "दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करण्याच्या काही मिनिटांपूर्वी मोठा स्फोट झाला. आमच्याकडे अद्याप मृतांचा आकडा आलेला नाही, परंतु जीवितहानी झाली आहे. सुरक्षा कर्मचारी आता इमारतीच्या आत लपून बसलेल्यांना निशाणा बनवत आहेत."

सोमालियामध्ये अल-शबाब

अल-शबाब ही दहशतवादी संघटना अल-कायदाचा एक गट आहे. प्रामुख्याने सोमालियामध्ये असलेल्या, या संघटनेचे पूर्ण नाव 'हरकत अल-शबाब अल-मुजाहिदीन' आहे. केनियाच्या (Kenya) दक्षिण सीमेवर त्यांचे अस्तित्व आहे. अल-शबाबचा एकमेव उद्देश सोमाली सरकार उलथून टाकणे आहे. अल-शबाब सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) वहाबी इस्लामचे अनुसरण करतो, जो इस्लामचा सर्वात कट्टरपंथी गट आहे.

तसेच, सोमालिया (Somalia) सरकारविरुद्ध दीर्घकाळ युद्ध लढणाऱ्या या दहशतवादी (Terrorist) संघटनेचा हा पहिला हल्ला नाही. अल शबाबने यापूर्वी मोगादिशू शहरात अनेक भीषण स्फोट घडवून आणले आहेत. अल-शबाब या दहशतवादी संघटनेची स्थापना 2006 मध्ये झाली होती. त्यावेळी मोगादिशू शहर युनियन ऑफ इस्लामिक कोर्ट या शरिया न्यायालयांच्या संघटनेच्या नियंत्रणाखाली होते. त्याचा प्रमुख शरीफ शेख अहमद होता. 2006 मध्ये इथिओपियन सैन्याने या संघटनेचा पराभव केला आणि अल-शबाबचा जन्म झाला. अल-शबाब ही इस्लामिक न्यायालयांच्या युनियनची कट्टरपंथी शाखा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT