Al Qaeda Dainik Gomantak
ग्लोबल

दहशतवाद्यांकडून UN च्या पाच कर्मचाऱ्यांचे अपहरण

दैनिक गोमन्तक

दक्षिण येमेनमध्ये अल कायदाच्या (Al Qaeda) दहशतवाद्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या पाच कर्मचाऱ्यांचे अपहरण केले आहे. येमेनच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांचे अपहरण करुन शुक्रवारी रात्री उशिरा दक्षिणेकडील अब्यान प्रांतातील अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. त्यांनी पुढे सांगितले की, यामध्ये चार येमेनी आणि एक परदेशी नागरिक आहे. त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. (Al Qaeda Terrorists Kidnap Five UN Staff Members In Yemen)

अपहरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले, "आम्हाला या प्रकरणाची माहिती आहे, परंतु काही कारणास्तव आम्ही यावर भाष्य करु इच्छिक नाही." त्याच वेळी, देशातील नेत्यांनी सांगितले की, कर्मचार्‍यांच्या सुटकेसाठी आम्ही अपहरणकर्त्यांशी वार्तालाप करत आहोत. अपहरणकर्त्यांनी खंडणीची मागणी केली असून आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारने तुरुंगात डांबलेल्या काही दहशतवाद्यांची सुटका केली आहे.

सशस्त्र लोकांनी अपहरण केले

येमेन सरकारने पुष्टी केली की, UN सुरक्षा आणि संरक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे अज्ञात सशस्त्र लोकांनी अपहरण केले आहे. येमेनमध्ये हुथी बंडखोरांनी दहशत केली आहे. हुथींनी देशाच्या अनेक भागांवर कब्जा केला आहे. त्यामुळे इतर अनेक दहशतवादी संघटनांनीही या भागात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ते लोकांचे अपहरण करुन दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत.

सौदी अरेबिया 2015 पासून हौथींशी लढत आहे

येमेनमधील सौदीच्या नेतृत्वाखालील सैन्य गठबंधन 2015 पासून इराण (Iran) समर्थक हुथी बंडखोरांशी लढा देत आहे. या सैन्य संघटनाने 2015 मध्ये येमेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात हस्तक्षेप केला होता. त्यानंतर हुथींनी येमेनची (Yemen) राजधानी असलेल्या साना ताब्यात घेऊन सरकारला सत्तेवरुन हटवले होते. या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. यामुळे येमेनमध्ये मोठी मानवतावादी आपत्ती निर्माण झाली आहे. लोकांकडे ना खायला अन्न मिळत आहे ना रोजगार. त्यांना इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT