al qaeda leader ayman al zawahiri
al qaeda leader ayman al zawahiri  Dainik Gomantak
ग्लोबल

इस्लामिक जिहादींना आदर्श बनवा, अल कायदा प्रमुखाने मुस्लिमांना केले आवाहन

दैनिक गोमन्तक

अल-कायदाचा प्रमुख नेता अयमान अल-जवाहिरीने आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्याने जगातील मुस्लिमांना प्रमुख जिहादी नेत्यांना आदर्श बनण्याचे आवाहन केले आहे. जवाहिरीने अलीकडच्या काळात अनेक व्हिडिओ जारी केले आहेत. 'डील ऑफ द सेंच्युरी ऑर क्रुसेड स्पॅनिंग सेंच्युरीज' या विषयाखाली हा त्याचा पाचवा व्हिडिओ आहे.

मुस्लिमांना अल कायदाच्या विचारसरणीचे पालन करण्याचे आवाहन

जिहादींवर बनवण्यात आलेला हा नवीन व्हिडिओ केवळ इस्लामिक कट्टरतावादालाच चिथावणी देत ​​नाही, तर जगभरातील दहशतवादी (Terrorist) धोक्याची पातळी किती उंचावली ते दर्शवतो. आधीच्या एका व्हिडिओमध्ये, जवाहिरीने अरब नेत्यांवर टीका केली होती. त्याचबरोबर मुस्लिमांना अल कायदाच्या विचारसरणीचे पालन करण्याचे आवाहन देखील त्याने केले आहे.

भारतीय शहरांमध्ये आत्मघाती हल्ले सुरु करण्याच्या धमक्या

अलीकडेच जवाहिरीने प्रेषित मुहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताविरुद्ध जिहादचे आवाहन करताना भारतातील (India) प्रमुख शहरांमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली होती. अहवालानुसार, जवाहिरी सध्या अफगाणिस्तानच्या सीमेवर वास्तव्यास आहे. दुसरीकडे मात्र, जवाहिरी इराणमध्ये असल्याचे सांगत तालिबान राजवटीने अफगाणिस्तानमध्ये असल्याचे नाकारले आहे.

अल कायदा पाय पसरत आहे

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा (Afghanistan) ताबा घेतल्यापासून अल कायदा बळकट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अल कायदा अमेरिकन सैन्याने मागे सोडलेली आधुनिक शस्त्रे, स्फोटके आणि नाईट व्हिजन उपकरणांसह स्वतःला मजबूत करत आहे. अल कायदाला (Al Qaeda) कतार आणि तुर्कस्तानसारख्या देशांकडूनही निधी मिळत आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या देशांतील युवकांना आकर्षित करत आहेत.

तालिबान हे जिहादींसाठी एक मॉडेल आहे

अल कायदासोबतच इस्लामिक स्टेट ऑफ खोरासानही अफगाणिस्तानात आपले स्थान निर्माण करत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर इस्लामिक स्टेटची आणखी ताकद वाढली आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट स्थापन झाल्यानंतर इस्लामिक दहशतवाद वाढू शकतो. कारण तालिबान (Taliban) हे जिहादींसाठी एक मॉडेल आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

SCROLL FOR NEXT