US Flights Grounded Dainik Gomantak
ग्लोबल

US Flights Grounded: ‘हवाई’ संकटामुळे अमेरिका ठप्प

नियंत्रण यंत्रणेतील बिघाडाचा हजारो विमान उड्डाणांना फटका

दैनिक गोमन्तक

US Flights Grounded: अमेरिकेच्या मध्यवर्ती हवाई वाहतूक प्रशासनाच्या (एफएए) यंत्रणेमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका या देशातील विमान वाहतुकीला बसला. यामुळे अनेक विमानांची उड्डाणे स्थगित करण्यात आली, तर काहींच्या उड्डाणाला विलंब झाला.

या घटनेनंतर तातडीने बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. त्यामध्ये यंत्रणेला बऱ्याचअंशी यशही आले; पण यंत्रणा पूर्ववत व्हायला किमान दोन दिवसांचा अवधी लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यानंतर ‘व्हाइट हाउस’मध्ये तातडीने आपत्कालीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी सहापर्यंतची सगळी उड्डाणे ही विलंबाने करावीत असे निर्देश ‘एफएए’ने विमान कंपन्यांना दिले आहेत.

अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्रणालीतील तांत्रिक बिघाडाचा भारतातील विमान वाहतुकीवर परिणाम होणार नाही असे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने म्हटले आहे.

अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांच्या सेवेवर देखील याचा काही परिणाम होणार नसल्याचे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. भारतामधील सर्वच उड्डाणे सुरळीतपणे सुरू असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: सनबर्न विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

Saint Francis Xavier Exposition: संशयित व्यक्तीची होणार चौकशी, CCTV तैनात; 98 टक्के काम पूर्ण; मुख्यमंत्री सावंत

IFFI Goa 2024: 'मोबाईल थिएटर' इफ्फीचे खास आकर्षण; प्रेक्षकांना मिळणार RRR आणि अपराजितोचा फिरता अनुभव

St. Xavier Exposition: 46 दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; जाणून घ्या सर्व पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था

SCROLL FOR NEXT