Artificial Intelligence Dainik Gomantak
ग्लोबल

Artificial Intelligence: ‘’एआय बनला जगासाठी सर्वात मोठा धोका’’, खुद्द गॉडफादरने व्यक्त केली चिंता

Artificial Intelligence: हे एक तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये स्वतःचा विकास करण्याची क्षमता आहे. महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी एआय हा एक मोठा धोका असल्याचे म्हटले होते.

Manish Jadhav

Artificial Intelligence: एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मानवी विकासाला नवी दिशा दाखवून दिली. तर दुसरीकडे, याच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गडांतर आले. सध्या संपूर्ण जग चिंतेत आहे. वास्तविक आर्टिफिशियल इंटेलिजन्सला (एआय) मर्यादा नाही. हे एक तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये स्वतःचा विकास करण्याची क्षमता आहे. महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी एआय हा एक मोठा धोका असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, मानवाचा विकास एका सीमित गतीने होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला (Artificial Intelligence) मर्यादा नाही. अशा परिस्थितीत मानव यंत्रांपेक्षा मागे पडेल आणि हा संपूर्ण मानवतेसाठी धोका आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन (Geoffrey Hinton) यांनी स्वतःच्या तंत्रज्ञानावर चिंता व्यक्त केली. हिंटन म्हणाले की, एआयमुळे लोक त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत याचे त्यांना दुःख आहे. एआयसाठी इतके दिवस काम केल्याची मला आयुष्यभर खंत वाटेल, असेही ते म्हणाले. एका मुलाखतीत ते म्हणाले की, हे कोणीही रोखू शकले नसते. मी ते केले नसते तर दुसऱ्या कोणीतरी केले असते.

दु:ख व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, ‘’या युगात युनिव्हर्सल बेसिक इनकमचा मार्ग प्रभावी ठरु शकतो. जॉब मार्केटमधील बदलांच्या युगात मला असे म्हणायचे आहे की युनिव्हर्सल बेसिक इनकम हा एक चांगला मार्ग आहे. AI उत्पादकता वाढवेल आणि भरपूर पैसा निर्माण करेल, परंतु यामुळे समाजात असमानता वाढेल. अनेक लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि दुसरीकडे बरेच लोक अत्यंत श्रीमंत होतील. हे समाजासाठी खूप धोकादायक असणार आहे.’’

ते शेवटी म्हणाले की, ‘एआय हे येत्या पाच ते 20 वर्षांतच मोठे आव्हान बनू शकते.’ जेफ्री हिंटन यांचा जन्म 6 डिसेंबर 1947 रोजी लंडनमध्ये (London) झाला होता. त्यांनी कॅम्ब्रिटमधून प्रायोगिक मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि नंतर कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात पीएचडी केली. ते गुगलमध्ये काम करत होते, पण आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT