Shandong University Sexual Debut Research Dainik Gomantak
ग्लोबल

First Sex Age: पहिला लैंगिक अनुभव ठरवणार तुमचे आरोग्य; वाढत्या वयाबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Shandong University Sexual Debut Research: माणसाचे वय वाढण्याची प्रक्रिया आणि त्याची शारीरिक क्षमता यावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो.

Manish Jadhav

Age Of First Sex And Ageing Study: माणसाचे वय वाढण्याची प्रक्रिया आणि त्याची शारीरिक क्षमता यावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. मात्र, तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या वयात लैंगिक संबंध ठेवले होते, याचा तुमच्या वृद्धत्वावर आणि आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो, असा एक अत्यंत रंजक आणि धक्कादायक खुलासा संशोधकांनी केला.

चीनमधील शांगडोंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या ताज्या अभ्यासानुसार, ज्या व्यक्तींच्या आयुष्यात लैंगिक संबंधांची सुरुवात खूप लवकर होते, त्यांच्यामध्ये वयाच्या उत्तरार्धात वृद्धत्वाची लक्षणे वेगाने दिसण्याची, शरीर अशक्त होण्याची आणि एकंदरीत आरोग्य खालावण्याची शक्यता जास्त असते. 'हेल्थकेअर अँड रिहॅबिलिटेशन' या वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात नवीन चर्चा सुरु झाली.

या अभ्यासाचे मुख्य लेखक कैक्सियन वांग यांनी स्पष्ट केले की, पहिल्या लैंगिक संबंधांची वेळ किंवा वय हे मानवी शरीराच्या मानसिक, वर्तनात्मक आणि विविध आजारांशी संबंधित घटकांशी जोडलेले असू शकते, ज्याचा थेट परिणाम पुढे जाऊन वृद्धत्वावर होतो. हे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणावर अनुवांशिक डेटाचा सखोल अभ्यास केला. त्यांनी अशा डीएनए मार्गर्सचा शोध घेतला, जे लोकांच्या पहिल्या लैंगिक अनुभवाच्या वयाशी संबंधित आहेत. त्यानंतर हे मार्गर्स भविष्यात आरोग्याशी संबंधित परिणामांवर कसा प्रभाव टाकतात, याची तपासणी करण्यात आली.

यावरुन संशोधक या निष्कर्षावर आले की, लवकर लैंगिक जीवनाची सुरुवात झालेल्या लोकांमध्ये मानसिक ताणतणाव, जुनाट आजार आणि दीर्घकालीन मानसिक आजारांचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे त्यांच्यात वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने होते.

संशोधकांनी या दोन घटकांमधील संबंध शोधण्यासाठी तब्बल 145 संभाव्य कारणांची तपासणी केली. त्यापैकी 34 कारणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. यामध्ये 'एडीएचडी' हा मानसिक आजार, तीव्र नैराश्याची भावना, फुफ्फुसाचे जुनाट आजार आणि शरीराची अत्यंत नाजूक किंवा अशक्त अवस्था यांचा प्रामुख्याने समावेश होता. लहानपणातील काही विशिष्ट अनुभव, मानसिक आव्हाने आणि जुनाट आजारांचा धोका काळानुरुप एकत्र येतो आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो.

मात्र, संशोधकांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली की, केवळ लैंगिक संबंधांमुळेच वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते, असे अजिबात नाही. यामागे बालपणीची कौटुंबिक किंवा सामाजिक परिस्थिती देखील कारणीभूत ठरु शकते, जी माणसाच्या लैंगिक वर्तनाला आणि भविष्यातील आरोग्याला आकार देते. या संशोधनाचे सह-लेखक लाँग सुन यांनी सांगितले की, पौगंडावस्थेत किंवा कमी वयात योग्य लैंगिक शिक्षण देणे, मानसिक आधार देणे आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात मिळालेला योग्य पाठिंबा आणि मार्गदर्शन भविष्यातील आरोग्याचे धोके कमी करु शकते आणि वृद्धापकाळ अधिक निरोगी आणि सुदृढ बनवण्यास मदत करु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT