Amazon Layoff: ट्विटर, मेटा आणि मायक्रोसॉफ्टनंतर आता ई-कॉमर्स जायंट असलेल्या अॅमेझॉन कंपनीतूनही कर्मचाऱ्यांची कपात सुरू झाली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. कंपनीने तोट्यात असलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांना दुसरी नोकरी शोधण्यास सांगितले आहे. कारण कंपनीचे अनेक विभाग बंद केले जाणार आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार जेफ बेझॉस यांची अॅमेझॉन कंपनी तोट्यातील उद्योगांचा आढावा घेत आहे. यात व्हॉईस असिस्टंट अॅलेक्सा बनवणाऱ्या युनिटचाही समावेश आहे. कंपनीच्या वाढत्या आर्थिक मंदीच्या कारणामुळे कर्मचारी कपात करावी लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
या माहितीनुसार अॅलेक्सा बिझनेसबाबत बारकाईने विचार केला जात आहे. त्याचे मुल्यांकन केले जात आहे. कारण व्हॉईस असिस्टंट मध्ये नव्या क्षमता जोडता येतील का, यावर विचार केला जात आहे. पण, त्यासाठी अधिक गुंतवणूक गरजेची आहे. आणि अनेक ग्राहक केवळ काही ठराविक कामांसाठीच या डिव्हाईसचा वापर होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
दरम्यान, अॅमेझॉनमधील एका उच्च अधिकाऱ्याने पाठवलेल्या एका अंतर्गत मेमेवरून कंपनीने नवीन भरती स्थगित केली आहे. एक सॉफ्टवेयर इंजिनीअर जेमी झांग यांनी लिंक्डइनवर अॅमेझॉनने कामावरून काढल्याची पोस्ट शेअर केली आहे. त्यात कंपनीने संपुर्ण रोबोटिक्स टीमलाच काढून टाकल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या रोबोटिक्स विभागात 3500 हून अधिक कर्मचारी होते.
दरम्यान, अॅमेझॉन कंपनीचे पीपल एक्सपीरियन्स अँड टेक्नोलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट बेथ गॅलेटी यांनी म्हटले आहे की, नवीन भरती स्थगित असली तरी काही प्रोजेक्टसाठी नवीन नियुक्ती आणि कर्मचाऱ्यांची रिप्लेसमेंट केली जाईल. भरती आणि गुंतवणूक यात समतोल साधला जाणार आहे. या आधीही आम्ही अशा आर्थिक आव्हानांचा सामना केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.