Switzerland Flag Dainik Gomantak
ग्लोबल

Switzerland: जीनीव्हातल्या व्हायरल व्हीडीओनंतर भारताने व्यक्त केली नाराजी

Switzerland: संपूर्ण जगासाठी स्वित्झलँडमधील जीनीव्हा शहराचे वेगळेच महत्व आहे.

दैनिक गोमन्तक

Switzerland: स्वित्झलँडमधील जीनीव्हा शहरात संयुक्त राष्ट्राच्या इमारतीबाहेर भारताविरोधी पोस्टर लावल्याची माहिती समोर आली आहे. भारताने या प्रकाराला विरोध करत स्वित्झलँडच्या राजदूताकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीनीव्हामध्ये शिक्षण घेत असलेल्या भारताच्या एका विद्यार्थिनीने सोशल मिडियावर व्हीडीओ शेअर केला आहे. हा व्हीडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या इमारतीबाहेर भारताविरोधी पोस्टर असल्याचे दिसून येत आहे.

सोशल मिडियावर असलेल्या या व्हीडीओमध्ये विद्यार्थिनीने म्हटले आहे की, मी रोज जेव्हा माझ्या इनस्टिट्युटकडे जात असते तेव्हा मला संयुक्त राष्ट्राच्या इमारतीबाहेर हे पोस्टर दिसतात. मला याचा तिरस्कार आहे.

भारतात ख्रिश्चन धर्मीयांना दहशतवादाला सामोरे जावे लागत आहे असे या पोस्टरवर लिहले आहे. बालविवाहासारख्या प्रथा आजही सुरु आहेत असे या पोस्टरवर लिहले आहे. मला माहित आहे की हे सगळे खोटे आहे.

मला माहित नाही की रोज या ठिकाणी असे पोस्टर कोठून येतात . पोस्टर लावणाऱ्यांना मला विचारायची इच्छा असते की ते हे असा प्रकार का करत आहेत मात्र मी गोष्टी सकारत्मतेने घेण्यावर विश्वास ठेवते असेही तिने आपल्या व्हीडीओत म्हटले आहे.

दरम्यान, संपूर्ण जगासाठी स्वित्झलँडमधील जीनीव्हा शहराचे वेगळेच महत्व आहे. विश्व व्यापार संगठन (WTO), वर्ल्ड काउंसिल ऑफ चर्चेज (WCC), यूरोपीय ऊर्जा आयोग (EEC), संयुक्त राष्ट्र शरणार्थी उच्च आयोग (UNHCR) या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे मुख्यालय या शहरात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT