20 Indian Fishermen Released From Pakistan  Dainik Gomantak
ग्लोबल

मासे पकडणं आलं आंगलठ! भारतीय मच्छिमारने पाकिस्तानच्या तुरुंगात काढले 4 वर्षे

पाकिस्तानच्या तुरुंगातुन 20 भारतीय मच्छिमारांची सुटका केल्यानंतर आता पाकिस्तानच्या तुरुंगात 568 भारतीय मच्छिमार आहेत.

दैनिक गोमन्तक

वाघा सीमेवरुन भारताच्या हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 20 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तान सोडणार आहे. एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. कराचीच्या (Karachi) लेंडी तुरुंगात ठेवण्यात आलेल्या मच्छिमारांची रविवारी मानवता आधारावर सुटका करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक अझीम थेबो यांनी सांगितले की, सदिच्छा म्हणून या 20 भारतीय मच्छिमारांची (20 Indian Fishermen Released From Pakistan) सुटका केल्यानंतर आता या तुरुंगात 568 भारतीय मच्छिमार आहेत.

या सुटका झालेल्या मच्छिमारांना (Fisherman) बेकायदेशीरपणे पाकिस्तानच्या (Pakistan) पाण्यात घुसून परवानगीशिवाय मासेमारी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. समाजकल्याणासाठी काम करणाऱ्या ‘ईधी फाऊंडेशन’ या संस्थेने त्यांना रस्त्याने लाहोरला नेले. ईधी फाऊंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, मच्छिमारांच्या लाहोरपर्यंतच्या प्रवासाचा खर्च संस्था उचलेल, जिथे त्यांना भारताच्या सीमा सुरक्षा दलाकडे सुपूर्द केले जाणार आहे. ईधी फाऊंडेशननेही सदिच्छा म्हणून प्रत्येक मच्छिमाराला पन्नास-पन्नास हजार रुपये दिले आहेत.

चार वर्षांपासून तुरुंगात असलेला मच्छिमार भावेश भिका म्हणाला की, तो ज्या बोटीवर होता ती रात्री वाहून गेली आणि पाकिस्तानच्या पाण्यात घुसली. आम्ही तुमच्या सीमेचे उल्लंघन केले आहे हे कळल्यानंतर आम्हाला मार्गच राहिला नाही. पाकिस्तान आणि भारत नियमितपणे सागरी सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल एकमेकांच्या मच्छिमारांना पकडतात.

भारत आणि पाकिस्तानने या वर्षाच्या सुरुवातीला कैद्यांच्या यादीची देवाणघेवाण केली, त्यानुसार किमान 628 भारतीय कैदी पाकिस्तानमध्ये आहेत, त्यापैकी 577 मच्छिमार आहेत. भारताने पाकिस्तानसोबत 355 पाकिस्तानी कैद्यांची यादी शेअर केली होती, त्यापैकी 73 मच्छिमार होते. एनजीओ पाकिस्तान फिशरमेन्स फोरमने सांगितले की, दोन्ही देशांमधील अरबी समुद्राच्या किनारपट्टीमध्ये स्पष्ट सीमांकन रेषा नसल्यामुळे, आधुनिक काळातील नेव्हिगेशन उपकरणे नसलेले मच्छिमार चुकून सीमा ओलांडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT