Afghanistan Women  Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: हस्तकला व्यवसायाला घरघर, अफगाण महिला पुन्हा रस्त्यावर; तालिबान सरकार म्हणाले....

Manish Jadhav

Afghanistan: तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तेथील परिस्थिती नरकाहून भीषण बनली आहे. विशेषत: महिलांची स्थिती अधिकच खालावली आहे. त्यांचे अधिकार तालिबानी सरकारने पूर्णपणे हिरावून घेतले. त्यांच्यावर विविध निर्बंध लादण्यात आले. त्याचवेळी, अफगाण महिलांनी चिंता व्यक्त केली आहे की, तेथील हस्तकलेच्या बाजारपेठेत मोठी घट झाली आहे. यामुळे महिला खूप नाराज आहेत.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांत हस्तकलेच्या बाजारपेठेत मोठी घसरण झाल्याचे बहुतांश महिलांचे म्हणणे आहे. बाजार तेजीत येण्यासाठी संबंधित संस्थांनी सहकार्य करावे, अशी मागणी या महिलांनी तालिबानी सरकारकडे केली आहे.

रोकसर या अफगाण महिला (Women) गुंतवणूकदाराने तालिबान सरकारकडे आर्थिक मदतीची याचना केली. रोकसर यांना हस्तकलेचा चार वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

महिलांना पाठिंबा द्यावा- रोकसर

रोकसर पुढे म्हणाल्या की, महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून पुढे प्रगती करावी यासाठी त्यांना पाठबळ दिले पाहिजे. बिझनेसमन बेनाफ्शा यांनी सांगितले की, ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हापासून त्यांच्या व्यवसायात घट झाली आहे.

बेनाफशा पुढे म्हणाल्या की, लोकांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने विक्री कमी झाली आहे. त्यांना आमची उत्पादने विकत घेणे परवडत नाही. तसेच महिलांसाठी एअर कॉरिडॉर बंद केल्यामुळे आमची उत्पादने परदेशात पाठवली जात नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

तालिबानने मदतीचे आश्वासन दिले

तालिबानच्या नेतृत्वाखालील उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते अखुंदजादा अब्दुल सलाम जवाद म्हणाले की, तालिबान (Taliban) व्यावसायिक महिलांना मदत करण्यास वचनबद्ध आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. हस्तकला व्यवसाय करणाऱ्या महिलांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जवाद म्हणाले.

महिलांसाठी हस्तकला बाजार तयार करणे

आम्ही त्यांच्या हस्तकलेसाठी देशांतर्गत आणि देशाबाहेर बाजारपेठ तयार करत आहोत, जेणेकरुन त्या देशाच्या वाणिज्य क्षेत्राचा एक शक्तिशाली भाग म्हणून महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील.

दरम्यान, महिला चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने सांगितले की, नांगरहार, लघमान, कुनार, नूरिस्तान, हेरात आणि काबूलसह अफगाणिस्तानच्या 16 प्रांतांमध्ये महिला चेंबर ऑफ कॉमर्स सुरु आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT