Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: अफगाणिस्तानच्या बाल्ख प्रांतात बॉम्बस्फोट, 7 ठार; अनेकजण गंभीर

Bombm Strikes Roadside in Afghanistan: अफगाणिस्तानच्या बाल्ख प्रांतात मंगळवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमन्तक

Bombm Strikes Roadside in Afghanistan: अफगाणिस्तानच्या बाल्ख प्रांतात मंगळवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, बाल्ख प्रांताची राजधानी मजार-ए-शरीफमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. इथे मंगळवारी सरकारी कर्मचार्‍यांची बस रस्त्याच्या कडेला बॉम्बच्या कडीखाली आली, त्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यात 7 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

6 जण जखमी झाल्याची माहिती आहे

मझार-ए-शरीफ शहरातील सरकारी कर्मचार्‍यांच्या (Employees) बसवर मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रस्त्याच्या कडेला बॉम्बचा स्फोट झाला, सिन्हुआ वृत्तसंस्थेने एका प्रवक्त्याच्या हवाल्याने म्हटले आहे. सात जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले.

पोलिसांनी हल्ल्याचा तपास सुरु केला

सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी सर्व कर्मचारी बसमधून आपापल्या कामाच्या ठिकाणी जात होते. या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरु केला आहे. आतापर्यंत कोणत्याही गट, व्यक्ती किंवा संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या हल्ल्याचे कारण आणि हल्लेखोरांची माहिती आम्ही गोळा करत आहोत. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे लवकरच समोर येईल.

मृतांचा आकडा वाढू शकतो

जिथे हा बॉम्बस्फोट झाला, तिथे उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा स्फोट खूप जबरदस्त होता. त्याचा आवाज दूरवर ऐकू येत होता. बसमधील अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. सध्या इक्ना हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचार सुरु असून त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माणसं पिंजऱ्यात आणि प्राणी मोकळे"! गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंटचा ‘रिव्हर्स रोल-प्ले’; मांसाहाराविरुद्ध प्राणी मुक्ती मोर्चा

Dhalanche Mand: डिचोलीत फुलू लागलेत धालांचे मांड! लोकसंस्कृतीचे दर्शन; 'रंभा अवसर' प्रथेचे आकर्षण

पोर्तुगीजांनी गोव्‍यात व्‍यसनं आणली, गोवेकरांनी आध्‍यात्‍मिक वारसा जपला; आता देवपूजेबरोबर जास्‍त मानवसेवा करण्‍याची गरज..

Goa Live News: उत्तर गोवा जिल्हा पंचायत: भाजपची नामांकने जाहीर

एकाच महिन्यात 200 अपघात आणि 18 बळी, नितीन गडकरींचे CM सावंतांना पत्र; वैयक्तिक लक्ष देण्याची मागणी!

SCROLL FOR NEXT