Afghan citizen Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan Crisis: तालिबानच्या विरोधात अफगाण नागरिक उतरले रस्त्यावर

अफगाण (Afghan citizen) आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

दैनिक गोमन्तक

20 वर्षांनंतर पुन्हा एकदा तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर देशात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. तालिबानी लढाऊ जवळजवळ प्रत्येक शहराच्या रस्त्यावर हातामध्ये शस्त्रे घेऊन जात असताना दिसत आहेत. येत्या काळात आफगाणिस्तानची दशा अन् दिशा काय असेल हे कोणालाच माहीत नाही. बहुतेक लोकांना असे वाटते की, पुन्हा एकदा त्यांना बंदूकांच्या छायेखाली जगावे लागेल. त्यामुळे अफगाणिस्तानचे लोक आता तालिबानच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. काबुलपासून कंधार आणि नंतर जलालाबादपर्यंत सर्वत्र अफगाणी निदर्शने करत आहेत. अनेक ठिकाणाहून गोळीबाराच्या बातम्याही येत आहेत. असे असूनही, अफगाण आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

अफगाणिस्तानातील त्यांच्या पूर्वीच्या राजवटींच्या तुलनेत ते उदारमतवादी असतील असे आश्वासन देताना अतिरेकी कोणत्याही मतभेदांना दूर करण्यास तयार आहेत. अनेकांना भीती आहे की तालिबान महिलांच्या हक्कांचा आणि मानवाधिकारांचा विस्तार करण्याच्या दोन दशकांच्या प्रयत्नांचा नाश करेल.

गुरुवारी काबूल विमानतळाजवळ (Kabul Airport) लोकांनी कारमध्ये मोर्चा काढला. या दरम्यान, त्यांनी अफगाण ध्वजाच्या सन्मानासाठी लांब काळे, लाल आणि हिरवे बॅनर धरले. नांगरहार प्रांतातील निदर्शनाशी संबंधित एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. एका निदर्शकाला गोळ्या घालण्यात आल्या आहेत, त्याला इतर नागरिक वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. खोस्त प्रांतात तालिबानच्या अधिकाऱ्यांनी प्रदर्शन दडपल्यानंतर 24 तासांचा कर्फ्यू लावला लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Ration Card Suspension: गोव्यात रविवारपासून 'या' रेशनकार्डांना बसणार तात्पुरती टाळेबंदी; ई-केवायसीनंतर पुन्हा सक्रिय

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

SCROLL FOR NEXT