Afghanis selling their daughters because of hunger-debt Dainik Gomantak
ग्लोबल

भाकरीसाठी अफगाणी लोक विकतायेत मुली!

अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबान (Taliban) राजवटीला 100 दिवस पूर्ण होऊनही परिस्थिती कुठेही सुधारताना दिसत नाही.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबान (Taliban) राजवटीला 100 दिवस पूर्ण होऊनही परिस्थिती कुठेही सुधारताना दिसत नाही. अफगाणिस्तानातील गरीब जनता तालिबानी राजवट आणि गरीब अर्थव्यवस्थेमुळे (economy) उपासमारीला सामोरे जात आहे. परिस्थिती अशी आहे की, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेकांना आपल्या मुलींना लग्नासाठी विकावे लागले आहे. आगामी काळात अफगाणिस्तानात बालविवाहांचे प्रमाण वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

एका वृत्तसंस्थेशी केलेल्या संभाषणात अफगाण मजूर फजलने सांगितले की, मला माझ्या 13 वर्षांच्या आणि 15 वर्षांच्या मुलींना विकावे लागले. त्यांच्याशी लग्न करणाऱ्या तरुणांचे वय दुप्पट आहे. यासाठी आम्हाला 3 हजार डॉलर्सचे पेमेंट मिळाले आहे. भविष्यात हे पैसे संपले तर मला माझी 7 वर्षांची मुलगीही विकावी लागेल. मला याबद्दल खूप खेद वाटतो पण मी असे केले नाही तर माझे संपूर्ण कुटुंब उपाशी मरेल.

त्याचवेळी, अफगाणिस्तानच्या महिला हक्क प्रचारक आणि वुमन अँड पीस स्टडीज ऑर्गनायझेशनच्या संस्थापक वाजमा फ्रो यांनी सांगितले की, हा विवाह नसून बाल बलात्कार आहे. त्या म्हणाल्या की, मी दररोज अशा केसेस ऐकत असते ज्यामध्ये 10 वर्षांच्या मुलींच्या लग्नाची प्रकरणे समोर येतात. युनिसेफने तर असे म्हटले आहे की लोक त्यांच्या 20-20 दिवसांच्या मुलींचे लग्न ठरवतात जेणेकरून त्यांना या बहाण्याने आर्थिक मदत मिळू शकेल.

मुलींना गुलाम किंवा नोकरांसारखे वागवले जाते

या मुलींची अफगाणिस्तानमध्ये 500 ते 2000 डॉलरपर्यंत विक्री केली जात आहे. कर्ज फेडण्यासाठी लोक त्यांना विकत आहेत. अहवालानुसार एका व्यक्तीने आपली 9 वर्षांची मुलगी त्याच्या घरमालकाला विकली होती कारण तो भाडे देऊ शकत नव्हता. दुसऱ्या एका प्रकरणात, एका व्यक्तीने आपल्या पाच मुलांना मशिदीत सोडले होते कारण तो त्यांची काळजी घेण्यास असमर्थ होता. यातील 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तीन मुलींची त्याच दिवशी विक्री करण्यात आली. या खूप वेदनादायक कथा आहेत. या मुलींना अनेकदा नोकर किंवा गुलामासारखी वागणूक दिली जाते.

अफगाणिस्तानातील 97 टक्के लोकसंख्या अत्यंत गरीब असू शकते

तालिबान या कट्टरपंथी गटाच्या सत्तेत अचानक पुनरागमन केल्याने परदेशात अफगाणिस्तानातील अब्जावधी डॉलर्सची संपत्ती अडकली आहे आणि बहुतेक आंतरराष्ट्रीय मदत थांबवली आहे. अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि लाखो लोक बेरोजगार आहेत किंवा बिनपगारी आहेत. खराब अर्थव्यवस्था आणि दुष्काळामुळे अफगाणिस्तानला आगामी काळात जगातील सर्वात वाईट मानवतावादी संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि 2022 च्या मध्यापर्यंत या देशातील 97 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जाऊ शकते असे UN एजन्सींचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT