Afghani Sikhs and Hindus Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणी शीख आणि हिंदूचा भारताऐवजी अमेरिका आणि कॅनडाला जाण्यास पसंती

भारताने (India) चालवलेल्या मोहिमेअंतर्गत अनेक अफगाण शीख आणि हिंदू सुरक्षितरित्या देशात आणण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) ताब्यात आल्यानंतर अनेक अफगाण शीख आणि हिंदू भारतात येण्याऐवजी अमेरिका आणि कॅनडाला जाण्याचा मार्ग शोधत आहेत. त्यामुळे त्यांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी विलंब होत आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने अफगाण नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी निर्णय घेतला आहे. भारताने चालवलेल्या मोहिमेअंतर्गत अनेक अफगाण शीख आणि हिंदू सुरक्षितरित्या देशात आणण्यात आले आहे.

माध्यमाच्या अहवालानुसार, इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी मंगळवारी सांगितले की, गुरुद्वारातर्फे पर्वनात राहणारे 70 ते 80 अफगाण शीख आणि हिंदू भारतात येऊ इच्छित नाहीत, ते कॅनडा किंवा अमेरिकेत जाण्याचा विचार करत आहेत. ते पुढे म्हणाले की, या अफगाण नागरिकांनी स्थलांतर प्रक्रियेत केवळ अडथळे निर्माण केले नाहीत, तर इतरांना बाहेर काढण्यासही विलंब केला.

अहवालानुसार, सूत्रांनी सांगितले की, एका शीख संघटनेने चार्टर्ड विमानातून सर्व अफगाण शीख आणि हिंदूंना बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतर सुमारे 100 लोक काबूल विमानतळावर पोहोचले परंतु त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. तसेच विमानतळावर त्याच्यांसाठी चार्टर्ड विमान आहे की नाही हे ही स्पष्ट नव्हते. अफगाणिस्तानमधील एका सूत्राने सांगितले, "अमेरिका किंवा कॅनडाकडे आश्रय मागण्यात काय हरकत आहे? भारतात गेलेल्या लोकांचे भविष्य काय असेल हे आम्हाला माहित आहे. तेथे रोजगाराच्या संधी नाहीत आणि त्यापैकी अनेकांना परत यावे लागेल किंवा दुसऱ्या देशात जावे लागेल. ”

शिखांना आणण्यासाठी अधिकारी संपर्कात - केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, भारतीय अधिकारी काबुलजवळील गुरुद्वारामध्ये आश्रय घेतलेल्या शीखांच्या संपर्कात आहेत आणि त्यांना लवकरात लवकर घरी आणले जाईल. भाजपचे खासदार हंसराज हंस (Hansraj Hans) यांनी या मुद्द्यावर पुरी यांची मदत घेतली होती. ते म्हणाले होते की भारतीय वंशाचे सुमारे 250 शीख काबूलजवळील गुरुद्वारामध्ये आश्रय घेत आहेत.

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर भारताने 16 ऑगस्टपासून लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली. भारताने मंगळवारी दुशांबेमधून 78 लोकांना परत आणले, ज्यात 25 भारतीय नागरिक आणि अनेक अफगाणिस्तान शीख आणि हिंदू यांचा समावेश आहे. त्याचवेळी, सोमवारी, अफगाणिस्तानातून बाहेर काढलेले 146 भारतीय नागरिक कतारच्या राजधानीतून 4 वेगवेगळ्या विमानांद्वारे भारतात पोहोचले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT