Afghanistan: अफगानिस्तानमध्ये तालिबानची राजवट आल्यापासून तालिबान वेगवेगळे नियम लागू करत आहे. काहीदिवसांपूर्वीच अफगानिस्तानमध्ये मुलींना उच्च शिक्षण घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
याआधीही मुलींना फक्त महिला प्रोफेसर किंवा वृद्ध पुरुष शिक्षकाने शिकवावे असा नियम लागू केला होता. शिक्षण घेणे हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे. तालिबान लावत असलेले अधिकार हे जाचक आहेतआणि व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत. आता अफगाणिस्तानमधील एक १८ वर्षाची मुलगी चर्चेत आली आहे.
या मुलीचे मारवा असून ती तालिबानने उच्च शिक्षणावर घातलेल्या बंदीविरुद्ध आवाज उठवला आहे. ती काही दिवसातच युनिव्हर्सिटीत प्रवेश घेणार होती. मात्र, तालिबानच्या निर्णयामुळे तिचे स्वप्न तुटण्याची शक्यता आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मला गौरवपूर्ण,शक्तीशाली आणि मजबूत वाटत आहे कारण मी त्यांच्याविरुद्ध लढत आहे. मी ते अधिकार मागत आहे जे अल्लाह ने मला दिले आहेत, असे मारवाने म्हटले आहे.
अफगानिस्तान ( Afghanistan )मध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. त्यानंतर, त्यांना छळाला सामोरे जावे लागले आहे. अशी पार्श्वभूमी असतानादेखील मारवा काबूल युनिव्हर्सिटीसमोर हातात पोस्टर घेऊन धाडसाने शांतपणे तालिबानच्या निर्णयाला विरोध दर्शवत आहे. दरम्यान , संपुर्ण जगाकडून तालिबान ( Taliban )च्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.