Afghanistan Currency Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan Currency: अफगानी चलन जगात भारी, तालिबानच्या कडक निर्बंधांमुळे सरकारला 'अच्छे दिन'

Afghanistan Currency: मानवतावादी मदतीतील अब्जावधी डॉलर्सचा ओघ आणि आशियाई शेजाऱ्यांसोबतचा व्यापार वाढल्याने ही वाढ दिसून आल्याचे सांगितले जात आहे.

Manish Jadhav

Afghanistan Currency: अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यापासून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. यातच आता, एक मोठी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचे चलन, या तिमाहीत जगातील सर्वोत्तम चलन म्हणून उदयास आले आहे. ब्लूमबर्गने संकलित केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.

आउटलेटने म्हटले आहे की, या कालावधीत अफगाण मूल्यात नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे, प्रामुख्याने मानवतावादी मदतीतील अब्जावधी डॉलर्सचा ओघ आणि आशियाई शेजाऱ्यांसोबतचा व्यापार वाढल्याने ही वाढ दिसून आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी सत्ता काबीज केल्यापासून तालिबानने (Taliban) त्यांच्या चलनावर पकड अधिक मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. या उपायांमध्ये स्थानिक व्यवहारांमध्ये डॉलर आणि पाकिस्तानी रुपयाच्या वापरावर बंदी घालणे आणि अमेरिकन डॉलर्स देशाबाहेर जाण्यावर कडक निर्बंध लादणे यांचा समावेश आहे.

ब्लूमबर्गने सांगितले की, त्यांनी ऑनलाइन ट्रेडिंगलाही गुन्हा घोषित केला आहे आणि या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवासाची धमकीही देण्यात आली आहे.

तथापि, अफगाणिस्तान हा सर्वात वाईट जागतिक मानवाधिकार विक्रमासह गरिब देश आहे. एका वर्षाच्या कालावधीत अफगाण मूल्यात 14 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे, तर कोलंबिया आणि श्रीलंकेच्या चलनांना मागे टाकून त्याने जागतिक यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.

जागतिक आर्थिक व्यवस्थेपासून अलिप्त

आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे अफगाणिस्तान मोठ्या प्रमाणावर जागतिक आर्थिक व्यवस्थेपासून अलिप्त आहे. जागतिक बँकेच्या अहवालात सांगितले आहे की, अफगाणिस्तानात (Afghanistan) बेरोजगारीचा दर उच्च आहे. दोन तृतीयांश कुटुंबे मूलभूत गरजांसठी संघर्ष करत आहेत. अफगाणिस्तानच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी, UN 2021 च्या अखेरीपासून निधी पाठवत आहे.

‘सराफ’ हे परकीय चलन विनिमयाचे प्रमुख साधन

अफगाणिस्तानमध्ये, 'सराफ' म्हणून ओळखले जाणारे मनी चेंजर्स, जे बाजारपेठेत स्टॉल लावतात किंवा शहरे आणि खेड्यांमध्ये दुकानाबाहेर आपला व्यवसाय चालवतात, ते सध्या परकीय चलन विनिमयाचे प्राथमिक साधन आहेत.

वास्तविक, देशाचे आर्थिक केंद्र म्हणून काम करणार्‍या 'सराय शहजादा' म्हणून ओळखल्या जाणार्‍या काबुलच्या खुल्या बाजारपेठेत दररोज लाखो डॉलर्सची देवाणघेवाण होते.

दुसरीकडे, आर्थिक निर्बंधांमुळे अफगाणिस्तानला पाठवलेले जवळजवळ सर्व पैसे आता हवाला मनी ट्रान्सफर सिस्टमवर अवलंबून आहेत. बर्‍याच प्रमाणात सराफा व्यवसाय या प्रणालीवर अवलंबून आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे की, या वर्षी अफगाणिस्तानला सुमारे $3.2 अब्ज मदतीची गरज आहे, परंतु आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वित्तीय ट्रॅकिंग एजन्सीनुसार केवळ $1.1 अब्ज प्रदान केले गेले आहेत.

अफगाणिस्तानमधील 41 दशलक्ष लोकांना उपासमारीचा धोका असल्याने संस्थेने गेल्या वर्षी सुमारे $4 अब्ज खर्च केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT