Abdul Razak Gurnah Nobel Prize Winner Dainik Gomantak
ग्लोबल

टांझानियाचे अब्दुलरज्जाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर

‘मूळ ठिकाणाहून विस्थापित झालेले लोक आणि जेथे विस्थापित त्यांचे नवीन घर वसवतात त्या स्थानावर होणारा परिणाम दाखवण्यासाठी हा पुरस्कार गुरनाह (Abdul Razak Gurnah) यांना जाहीर झाला आहे.

दैनिक गोमन्तक

यंदाचे साहित्यातील नोबेल पारितोषिक (Nobel Prize) गुरुवारी ब्रिटिश-आधारित टांझानियन लेखक अब्दुलरज्जाक गुरनाह (Abdul Razak Gurnah) यांना जाहीर झाले आहे. ‘मूळ ठिकाणाहून विस्थापित झालेले लोक आणि जेथे विस्थापित त्यांचे नवीन घर वसवतात त्या स्थानावर होणारा परिणाम दाखवण्यासाठी हा पुरस्कार गुरनाह यांना जाहीर झाला आहे. स्वीडिश अकादमीने म्हटले आहे की, हा पुरस्कार वसाहतवादाचे परिणाम, संस्कृती आणि महाद्वीपांमध्ये अडकलेल्या निर्वासितांच्या भवितव्याचे वास्तव आणि स्पष्ट दर्शन गुरनाह यांनी दाखवून दिले आहे. गुरनाह यांनी अलीकडेच केंट विद्यापीठातून (University of Kent) पोस्टकोलोनियल लिटरेचरचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले असून सध्या दक्षिण -पूर्व इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत. नोबेल पुरस्काराबाबत स्वीडिश अकादमीकडून फोन आल्यावर ते म्हणाले, मी खूप उत्साहित आहे.

1948 मध्ये झांझीबारमध्ये जन्मलेले गुरनाह 1968 मध्ये निर्वासित म्हणून ब्रिटनमध्ये आले. त्यांनी 10 कादंबऱ्या लिहिल्या असून ज्यात मेमरी ऑफ डिपार्चर, पिलग्रीम्स वे, पॅराडाइज, बाय द सी आणि डेजर्शनचा समावेश आहे. त्यांची मूळ भाषा 'स्वाहिली' (Swahili) असून, ते इंग्रजीमध्ये लिखान करतात. साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे ते सहावे आफ्रिकन वंशाचे लेखक आहेत.

उत्तर -औपनिवेशिक साहित्यातील जगातील अग्रगण्य लेखकांपैकी एक

नोबेल कमिटी फॉर लिटरेचरचे अध्यक्ष अँडर्स ओल्सन यांनी त्यांना उत्तर -औपनिवेशिक साहित्यातील जगातील अग्रगण्य लेखकांपैकी एक म्हणून वर्णन केले. ते म्हणाले, "त्यांचे कार्य आफ्रिकेचे एक वैविध्यपूर्ण आणि स्पष्ट चित्र रेखाटते ज्याबद्दल अनेक वाचकांना माहिती नाही."

नोबेल पारितोषिक विजेत्याची निवड स्वीडिश अकादमीच्या 18 सदस्यांद्वारा केली जाते. गेल्या वर्षी, अमेरिकन कवी लुईस ग्लुक यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. साहित्यातील नोबेल पारितोषिक आतापर्यंत 118 वेळा देण्यात आले आहे.

भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना प्रदान

भूतकाळात भौतिकशास्त्रातील अनेक न उलगडलेल्या रहस्यांचा अंदाज बांधण्याचा मार्ग उघडणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना 2021 साठी भौतिकशास्त्राचे नोबेल देण्यात आले. जपानचा सौकुरो मनाबे, जर्मनीचा क्लास हेसलमन आणि इटलीचा जॉर्जियो पॅरीसी यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT