A23a World's Largest Iceberg News Dainik Gomantak
ग्लोबल

जगातील सर्वात मोठा हिमखंड घडवणार विनाश, लाखो लोकांचे जीव धोक्यात; दुर्मिळ प्रजाती होणार नष्ट

A23a World's Largest Iceberg News: जगातील सर्वात मोठा हिमखंड A23a आता मोठा विनाश घडवणार आहे! तो दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण अटलांटिकमध्ये असलेल्या आसपासच्या बेटांना टक्कर देण्याच्या वाटेवर आहे.

Manish Jadhav

World's Largest Iceberg: जगातील सर्वात मोठा हिमखंड A23a आता मोठा विनाश घडवणार आहे! तो दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण अटलांटिकमध्ये असलेल्या आसपासच्या बेटांना टक्कर देण्याच्या वाटेवर आहे. यामुळे या प्रदेशातील समृद्ध जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, ज्यामध्ये पेंग्विन, सील आणि दुर्मिळ सागरी प्रजातींचा समावेश आहे. जर ही टक्कर झाली तर लाखो प्राण्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते.

A23a: जगातील सर्वात मोठा हिमखंड

दरम्यान, A23a हिमखंडाचा आकार ग्रेटर लंडनच्या दुप्पट आहे. 1986 मध्ये तो फिल्चनर-रोन आइस शेल्फपासून वेगळा झाला होता. सुरुवातीच्या दशकांमध्ये, तो समुद्राच्या तळाशी थटून हळूहळू वितळले असे तज्ञांकडून सांगण्यात आले होते. मात्र 2020 मध्ये त्याने दक्षिण महासागराकडे सरकून आपला प्रवास सुरु केला होता.

दुसरीकडे, 'टेलर कॉलम्स' नावाच्या समुद्री भोवऱ्यांमध्ये हा हिमखंड अडकलेला आढळला होता. हे भोवरे समुद्राखालील टेकड्यांमुळे होतात आणि हिमखंडांना थांबवतात. A23a चे वजन एक ट्रिलियन टनांपेक्षा जास्त असून तो या भोवऱ्यांपासून वाचण्यात यशस्वी ठरला.

आता ते एक मोठे संकट निर्माण झाले

दक्षिण जॉर्जिया क्षेत्र हे जैवविविधतेचे समृद्ध केंद्र आहे. या बेटावर पेंग्विन आणि सील मोठ्या संख्येने राहतात. जर A23a नावाचा हा हिमखंड येथे आदळला तर या पक्षी प्रजातींना मोठा धोका निर्माण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Goa: प्रसिद्ध पर्यटनस्थळ मिनी गोवा येथे चार शालेय मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला

Ganesh Chaturthi: 'जयदेव.. जयदेव'! गावागावांत घुमतोय आरतीचा निनाद; भजनाचे स्‍वर अन्‌ फुगड्यांच्‍या ताल

Matoli: 'यंदाच्या वर्षी नवीन काय'? दुर्मिळ फळांची-वनस्पतींची, औषधी गुणधर्मांची लाखमोलाची 'माटोळी'

Goa Live Updates: माटोळीत साकारले ऑपरेशन सिंदूर

Fatorda: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! बेकायदेशीर मासळी विक्रीमुळे परिसर दुर्गंधीमय; डासांची पैदास वाढली

SCROLL FOR NEXT