A living roundworm From Snakes And pythons worm found in the brain of woman in Australia. Dainik Gomantak
ग्लोबल

Live Worm In Womans Brain: अजगरांमध्ये आढळणारा जंत महिलेच्या मेंदूत, वैद्यकिय क्षेत्रात खळबळ

Live Worm In Womens Brain: एका न्यूरोसर्जनने ऑस्ट्रेलियातील महिला रुग्णाच्या मेंदूतून 8 सेमी-लांब जिवंत जंत काढला. ही जगातील अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचे समोर आले आहे.

Ashutosh Masgaunde

A Living Roundworm From Snakes And Pythons Found in The Brain of Woman in Australia:

ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे एक विलक्षण घटना उघडकीस आल्याने, वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. एका न्यूरोसर्जनने रुग्णाच्या मेंदूमधून 8 सेमी-लांब जिवंत जंत (Parasitic Roundworm), काढला.

कॅनबेरा हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. हरी प्रिया बंदीचा यांनी न्यू साउथ वेल्समधील 64 वर्षीय महिलेवर ही शस्त्रक्रिया केली.

या महिलेला सुरुवातीला ओटीपोटात दुखणे, जुलाब आणि ताप यासारखे त्रास सुरू झाले. स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या या रुग्णाला होणारा त्रास वाढला. त्यामुळे तिला अखेरीस कॅनबेरा रुग्णालयात उपचारासाठी नेले, जिथे तिच्या मेंदूच्या एमआरआय स्कॅननंतर, मेंदूची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यक्ता जाणवली.

महिलेची शस्त्रक्रिया सुरू असताना न्यूरोसर्जन डॉ. हरी प्रिया बंदीचा यांना मेंदूमध्ये एक वळवळणार जिवंत जंत सापडला.

सापांमध्ये आढळतात हे जंत

सर्जिकल पथकाला 3 इंच लांबीचा, चमकदार लाल, राउंडवर्म सापडला ज्याला शास्त्रज्ञ ओफिडास्कॅरिस रॉबर्टसी असे म्हणतात.

या महिलेच्या मेंदूत अशा प्रकारचा जंत सापडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कारण हा जंत सामान्यतः सापांमध्ये आढळतो.

राउंडवर्मचा हा विशिष्ट प्रकार कार्पेट पायथन्समध्ये आढळतो, जो कंस्ट्रक्टरची एक मोठी प्रजाती आहे. ते ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनीमध्ये आढळतात.

महिलेच्या कसा पोहचला जंत?

सापांमध्ये आढळणारा किडा महिलेच्या शरीरात कसा पोहोचला याचे डॉक्टरांना कोडे पडले आहे. त्याचा सापांशी थेट संबंध नव्हता, पण त्याच्या घराजवळील तलावावर अनेक साप आहेत.

महिलेने खाल्लेल्या पालकासारख्या खाद्यपदार्थावर जंतांची अंडी आली असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही महिला तिच्या घराच्या परिसरात पालक पिकवत असे, त्यामुळे त्यावर अळीची अंडी आली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारे रोग

या प्रकरणामुळे प्राण्यांमध्ये आढळणारे आजार आता माणसांमध्येही संक्रमित होत आहेत हे दिसून येते. मात्र, या महिलेचा हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही.

कीटक आणि सापांचे जगभरात वास्तव्य असल्याने येत्या काळात जगातील इतर देशांतही असेच प्रकार पाहायला मिळतील.

दुसरीकडे, या महिलेची प्रकृती आता ठीक आहे, परंतु अद्यापही तिच्यात काही लक्षणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT