A liquor and meat party was organized at Kartarpur Sahib's Gurdwara in Pakistan. Dainik Gomantak
ग्लोबल

Watch Video: गुरुद्वारामध्ये दारू आणि नॉन-व्हेट पार्टी, पाकिस्तानातील कृत्यावर शीख समुदाय संतप्त

Kartarpur Sahib Gurdwara: करतारपूर साहिब गुरुद्वाराला, गुरुद्वारा दरबार साहिब म्हणून ओळखले जाते. शिखांसाठी हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे, कारण गुरु नानक देव यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची वर्षे येथे घालवली होती.

Ashutosh Masgaunde

A liquor and meat party was organized at Kartarpur Sahib's Gurdwara in Pakistan:

शीख समुदायाच्या भावनांशी खेळण्याचे प्रकार समोर आला आहे. येथील करतारपूर साहिब येथील गुरुद्वाराची विटंबना करण्यात आली आहे.

करतारपूर साहिबच्या गुरुद्वाराच्या दर्शनी देवरीपासून अवघ्या 20 फूट अंतरावर दारू आणि मांसाहार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत.

व्हिडिओमध्ये लोक दारूच्या नशेत जोरदार नाचताना दिसत आहेत. पंडालमध्ये मांसाहारासाठी टेबल आहे. पार्टीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शीख समुदायात प्रचंड संताप आहे.

ही पार्टी पाकिस्तानच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटचे सीईओ मोहम्मद अबू बकर आफताब कुरेशी यांनी आयोजित केली होती.

पाकिस्तानातील नारोवालचे डीसी मोहम्मद शारुख, पोलिस अधिकाऱ्यांसह विविध समुदायातील 80 हून अधिक लोकांसह पार्टीत सहभागी झाले होते.

नरोवालचे माजी खासदार आणि कर्तारपूर कॉरिडॉरचे राजदूत शीख रमेश सिंग अरोरा हे देखील या पार्टीत उपस्थित होते. इतकंच नाही तर करतारपूर साहिबचे मुख्य ग्रंथी ग्यानी गोविंद सिंह देखील या पार्टीत सामील झाले होते.

ही घटना समोर आल्यानंतर शीख नेते आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव मनजिंदर सिंग सिरसा यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, 'गुरुद्वारा श्री करतारपूर साहिबच्या पवित्र परिसरात दारू आणि मांस खाण्याच्या अपवित्र घटनेचा मी तीव्र निषेध करतो. यात करतारपूर गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचाही सहभाग होता हे निराशाजनक आहे. मी ताबडतोब पाकिस्तान सरकारला विनंती करतो की, सर्व जबाबदार लोकांवर पूर्ण आणि त्वरित कारवाई करावी. पाकिस्तान सरकारने अल्पसंख्याकांचा विश्वास कमी करू नये.'

काय आहे करतारपूर साहिब?

करतारपूर साहिब गुरुद्वाराला, गुरुद्वारा दरबार साहिब म्हणून ओळखले जाते. शिखांसाठी हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे, कारण गुरु नानक देव यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची वर्षे येथे घालवली होती.

नानकजींनी आपले 16 वर्षे आयुष्य येथे घालवले. पुढे गुरू नानक देव यांनी याच ठिकाणी आपला देह सोडला. त्यानंतर येथे गुरुद्वारा दरबार साहिब बांधण्यात आले.

हे ठिकाण पाकिस्तानातील पंजाबमधील नारोवाल जिल्ह्यात करतारपूर येथे आहे. हे ठिकाण लाहोरपासून 120 किलोमीटर अंतरावर आणि भारत-पाकिस्तान सीमेपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

2026 Lucky Zodiac Sign: शुक्र-बुधाची जादू तर सूर्य-मंगळाचा धडाका! जानेवारी महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; 2026 ची सुरुवात ठरणार सुवर्णकाळ

गोव्यात नाताळचा उत्साह! मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून शांतता व एकात्मतेचा संदेश; आर्चबिशपांनी केली शांततेची प्रार्थना

कलंगुट पोलिसांची मोठी कारवाई! साडेचार लाखांच्या ड्रग्जसह हळदोणचा तरुण गजाआड; ख्रिसमसच्या तोंडावर तस्करांचे धाबे दणाणले

Goa Politics: 'त्याचा' फटका विधानसभेत बसणार नाही! मतांच्या टक्केवारीतून जनतेने भाजपलाच कौल दिला; दामू नाईक

आयपीएल 2026 पूर्वी आरसीबीचं वाढलं टेन्शन, लैंगिक अत्याचारप्रकरणी स्टार गोलंदाजाला कोर्टाचा दणका; कोणत्याही क्षणी अटक?

SCROLL FOR NEXT