Pakistan: करतारपूर कॉरीडॉरसाठी पाकिस्तानने नेमला पहिला राजदूत

Pakistan: आता या कॉरिडॉरसाठी शहबाज शरीफ यांनी राजदूताची नेमणूक केली आहे.
Pakistan
PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan: पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान इमरान खान सत्तेत असताना 2019 मध्ये करतारपूर कॉरिडॉरचे उद्धाघटन केले होते. आता या कॉरिडॉरसाठी शहबाज शरीफ यांनी राजदूताची नेमणूक केली आहे.

सरदार रमेश सिंह अरोड़ा हे पाकिस्तानचे पहिले राजदूत म्हणून काम करणार आहेत. सरदार रमेश सिंह अरोड़ा हे करतारपूरचे रहिवासी असून पाकिस्तान मुस्लिम लीगच्या अल्पसंख्याक विंगचे महासचिवदेखील आहेत.

याबरोबरच त्याचे कुटुंब शीख धर्माच्या पवित्र स्थळांचे कल्याण आणि सुरक्षा करण्यात जोडले गेले आहे. करतारपूर कॉरिडॉरसाठी आत्ता राजदूत नेमण्याचे कारण म्हणजे हा कॉरिडॉर खुला केल्यापासून सरकारला अपेक्षित असलेले श्रद्धाळूची संख्या अत्यंत कमी आहे. महत्वाचे म्हणजे, भारतातून श्रद्धाळू कमी येत असल्याचे म्हटले जात आहे.

Pakistan
Chinese Super Cow: चीनमधील 'सुपर गाय' देते 100 टन दूध; क्लोनिंगद्वारे बनवल्या आणखी तीन गायी... वाचा सविस्तर

दरम्यान, नोव्हेंबर 2019 मध्ये पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान इमरान खान यांनी गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त करतारपूर कॉरिडॉरचे उद्धाटन केले होते.

करतारपूर कॉरिडॉर पाकिस्तानमध्ये गुरुद्वारा दरबार साहिबला भारतातील पंजाबमधील डेरा बाबक गुरुद्वाराला जोडतो.चार किलोमीटर असलेला हा कॉरिडॉरमधून श्रद्धाळू व्हीजीशिवाय जाऊ शकतात.

त्यामुळे आता पाकिस्तान( Pakistan )ने या कॉरिडॉरसाठी राजदूताची नियुक्ती करुन उचललेल्या या पावलाने श्रद्धाळूंची संख्या वाढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com