9/11 Attack Anniversary Dainik Gomantak
ग्लोबल

9/11 Attack Anniversary: एका झटक्यात 3000 लोक मारले गेले, महासत्तेला हादरवणाऱ्या त्या हल्ल्याची गोष्ट!

9/11 Attacks History: 9 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला दहशतवादी हल्ला 9/11 हल्ल्याच्या नावाने संपूर्ण जगाला माहीत आहे.

Manish Jadhav

9/11 Attacks History: 9 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला दहशतवादी हल्ला 9/11 हल्ल्याच्या नावाने संपूर्ण जगाला माहीत आहे.

अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. 2001 मध्ये, न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीवर आत्मघाती हल्ले झाले होते. या आत्मघातकी हल्ल्यांनी महासत्ता असलेली अमेरिका हादरली होती.

या भीषण दहशतवादी हल्ल्यात सुमारे 3 हजार लोक मारले गेले होते. खालिद शेख मोहम्मद हा अमेरिकेतील 9/11 हल्ल्याचा सूत्रधार मानला जातो, तो मुस्लिम ब्रदरहूडचा सक्रिय सदस्य होता.

9/11 च्या हल्ल्याची योजना कशी आखली?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, खालिद मोहम्मद शेखला 90 च्या दशकात डझनभर विमानांमधून अमेरिकेवर (America) हल्ला करायचा होता, पण त्याची योजना अयशस्वी झाली होती.

यानंतर त्याने दहशतवादी ओसामा बिन लादेनशी हातमिळवणी केली आणि त्याच्यासोबत 9/11 चा हल्ला घडवून आणला. 9/11 च्या हल्ल्याच्या भीषणतेची कल्पना तुम्ही यावरुन करु शकता की, या दहशतवादी हल्ल्यातील बळींची ओळख या घटनेला 22 वर्षे उलटूनही होत आहे.

अलीकडेच, दोन नवीन बळींची ओळख पटली होती. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या एका महिला आणि व्यक्तीबद्दल जाणून घेतले.

9/11 च्या हल्ल्यासाठी लादेनने आर्थिक मदत केली होती

दहशतवादी संघटना अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याने वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील 9/11 हल्ल्यासाठी आर्थिक मदत केली होती. ओसामा हा सौदी अरेबियाचा (Saudi Arabia) नागरिक असून अफगाणिस्तानात राहत असताना तो दहशतवादी संघटना चालवत असे.

9/11 च्या हल्ल्याच्या 8 वर्षांपूर्वी वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ बॉम्बस्फोट झाला होता. कारमधील स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी, शेकडो लोक जखमी झाले होते.

9/11 चा हल्ला कसा झाला?

11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाच्या दहशतवाद्यांनी 4 विमानांचे अपहरण केले होते. आत्मघातकी हल्ला करणे हा त्यांचा उद्देश होता.

अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट 11 चा पहिला अपघात झाला होता. हे अपहरण केलेले विमान सकाळी 8.46 वाजता न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरला धडकले. बरोबर 17 मिनिटांनंतर, अमेरिकन एअरलाइन्सचे दुसरे विमान साऊथ टॉवरला धडकले.

त्यानंतर सकाळी 9.37 वाजता अमेरिकन एअरलाइन्सचे तिसरे विमान वॉशिंग्टनमधील अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीला जावून धडकले. यानंतर चौथे विमान पेनसिल्व्हेनियातील शँक्सविले येथील मैदानी भागात पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे टार्गेट व्हाईट हाऊस किंवा यूएस कॅपिटल बिल्डिंग होते, परंतु प्रवाशांशी झालेल्या भांडणात दहशतवाद्यांनी फ्लाइटवरील नियंत्रण गमावले. हा हल्ला इतका भीषण होता की, वर्ल्ड ट्रेड सेंटर अनेक दिवस जळत राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

SCROLL FOR NEXT