Unique Viral Love Story News: ‘प्रेमाला वयाचे बंधन नसते’ ही म्हण आपण आजवर अनेकदा ऐकली असेल, पण जेव्हा हीच म्हण प्रत्यक्ष आयुष्यात खरी ठरते, तेव्हा आपण थक्क होतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अनोख्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा सुरु आहे. फ्रान्समध्ये राहणाऱ्या एका 81 वर्षांच्या वृद्ध महिलेला इंटरनेटच्या माध्यमातून आफ्रिकेतील सेनेगल या देशात राहणाऱ्या अवघ्या 24 वर्षांच्या तरुणावर प्रेम जडले. तब्बल दोन वर्षे एकमेकांना न भेटता, फक्त व्हिडिओ कॉल आणि मेसेजच्या आधारे दोघांचे प्रेम फुलत गेले. अखेर आपल्या प्रेमाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी या आजींनी वयाची पर्वा न करता हजारो किलोमीटरचा प्रवास करुन थेट सेनेगल गाठले.
आजच्या डिजिटल युगात अंतराला काहीच महत्त्व उरले नाही, हेच या अनोख्या जोडप्याने सिद्ध केले. 81 वर्षांची फ्रांसीसी महिला आणि 24 वर्षांचा सेनेगलचा तरुण यांच्या वयात तब्बल 57 वर्षांचे अंतर आहे. दोन वर्षांच्या ऑनलाईन अफेअरनंतर जेव्हा ही महिला सेनेगलच्या विमानतळावर उतरली, तेव्हा या दोघांची भेट अगदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे झाली. विमानतळावर दोघेही एकमेकांना अत्यंत प्रेमाने मिठी मारताना दिसले. तिथे उपस्थितांपैकी कोणीतरी या भावुक क्षणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. पाहता पाहता हा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला असून त्यावर नेटिझन्सच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
विशेष म्हणजे, हे अनोखे नाते फक्त भेटीगाठीपुरते मर्यादित राहिलेले नाही. या जोडप्याने आपल्या या प्रेमाच्या नात्याला अधिकृत नाव देण्याचा मोठा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सेनेगलमध्ये एकमेकांची भेट घेतल्यानंतर आता हे जोडपे फ्रान्सला परत जाण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबर महिन्यात हे दोघे अधिकृतरित्या विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या (Marriage) या निर्णयामुळे सोशल मीडियावरील युझर्स दोन गटांत विभागले गेले आहेत. काही लोक वयाचा विचार न करता याला 'सच्चे प्रेम' म्हणत त्यांचे कौतुक करत आहेत, तर काही लोक या अजब नात्यावर प्रश्न उपस्थित करत तरुणाच्या हेतूवर शंका व्यक्त करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.