75 people killed in oil tanker blast in Haiti 

 

Dainik Gomantak

ग्लोबल

हैतीत विचित्र स्फोट,75 जणांचा जळून मृत्यू

हैती शहरात कॅप-हैतीनमध्ये इंधनाचा ट्रक उलटून स्फोट होऊन 75 जणांचा मृत्यू झाला आहे

दैनिक गोमन्तक

हैती (Haiti) शहरात कॅप-हैतीनमध्ये इंधनाचा ट्रक (Oil Truck) उलटून स्फोट होऊन 75 जणांचा मृत्यू झाला आहे(Gas tanker blast). स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या पूर्वेकडील सनमारी परिसरात रात्री पेट्रोल वाहून नेणारा ट्रक उलटल्याने 75 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात अनेक जण भाजले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय या घटनेत 20 घरेही जळून खाक झाली आहेत.(75 people killed in oil tanker blast in Haiti )

मिळालेल्या माहितीनुसार, इंधनाचा टँकर उलटल्यानंतर तेल विखुरले होते, जे भरण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे पोहोचले. हे लोक कंटेनरमध्ये इंधन भरत असताना, त्याचवेळी टँकरमध्ये स्फोट झाला आणि त्यात अनेक लोक जिवंत जळाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैतीमध्ये विजेची मोठी समस्या आहे. त्यामुळे येथील लोक जनरेटरवर अधिक अवलंबून राहतात आणि त्यासाठी इंधनाची गरज असते. अशा परिस्थितीत जेव्हा टँकर उलटला तेव्हा लोकांना वाटले की इंधन मोफत मिळेल, पण दुर्दैवाने त्याचवेळी त्याचा स्फोट झाला.

देशाचे पंतप्रधान एरियल हेन्री यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या घटनेत भाजलेल्यांपैकी बहुतांश जणांची ओळख पटवणे कठीण जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महापौर यव्रॉस यांनी सांगितले की, एक वेगवान टँकर अनियंत्रितपणे उलटला, त्यानंतर जवळचे लोक तेल गोळा करण्यासाठी लहान कंटेनर घेऊन तेथे पोहोचले, तेव्हाच ही वेदनादायक दुर्घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT