Ghana: आफ्रिकन देश घानामध्ये एक प्रकरण चांगलेच गाजत आहे. 63 वर्षीय एका धर्मगुरुने 12 वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याने देशात वाद निर्माण झाला आहे. लग्न करणारा वयोवृद्ध धर्मगुरु प्रभावशाली व्यक्ती आहे. मुलीसोबतच्या त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. या प्रकरणामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. दरम्यान, या प्रभावशाली वयोवृद्ध व्यक्तीच्या समर्थनार्थ काही नेते मैदानात उतरले आहेत. ते म्हणाले की, ही त्यांच्या देशाची जुनी परंपरा आहे. मुलीने वयाच्या 6 व्या वर्षी त्याच्याशी लग्न करण्यासाठी विधी करण्यास सुरुवात केली होती. दुसरीकडे मात्र, पोलिसांनी मुलीची सुटका केली असून सध्या ती तिच्या आईच्या संरक्षणात आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, घानाची राजधानी अक्रा येथील नुनगुआ भागातील एक धर्मगुरु नुमो बोरकेते लावेह त्सुरु XXXIII यांनी शनिवारी एका 12 वर्षांच्या मुलीशी लग्न केले. या लग्नाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्सुरु हे या भागातील एक प्रभावशाली धार्मिक नेते आहेत, ज्यांना स्थानिक पातळीवर "गबोरबु वुलोमो" म्हणून ओळखले जाते. घानामध्ये लग्नाचे किमान वय 18 वर्षे आहे, तरीही 12 वर्षांच्या मुलीसोबत लग्न केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात मुलीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि या वयोवृद्ध वराने मॅचिंग ड्रेस घातला आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या ओळखीच्या लोकांनी तिला पतीची सेवा करण्याचा सल्ला दिला. शिवाय, तिला परफ्युमसह अनेक वस्तू भेट दिल्या.
मुलीने वयाच्या सहाव्या वर्षी संबंधित व्यक्तीच्या पत्नी होण्यासाठी आवश्यक विधी सुरु केले होते. मात्र, पोलिसांनी मुलीची ओळख पटवून तिचा शोध घेतला. आता ती तिच्या आईच्या संरक्षणात आहे. घानाच्या सरकारने या वादग्रस्त विवाहावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आफ्रिकन देश घानामध्ये अशाप्रकारची लग्नाची ही पहिलीच घटना नाही. गर्ल्स नॉट ब्राइड्स या एनजीओच्या म्हणण्यानुसार, घानामधील बहुतांश मुलींची लग्ने प्रौढ होण्यापूर्वीच केली जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.