Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

इराणमध्ये 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपात 3 ठार, UAE मध्येही जाणवले भूकंपाचे धक्के

दक्षिण इराणमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे किमान तीन जणांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

शनिवारी पहाटे दक्षिण इराणमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे किमान तीन जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती सरकारी टेलिव्हिजनने दिली आहे. इराणच्या (Iran) आखाती किनारपट्टीवरील होर्मोझगान प्रांतातील आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख मेहरदाद हसनजादेह यांनी टेलिव्हिजनला सांगितले की, "दुर्दैवाने आतापर्यंत आमच्याकडे तीन मृत्यू आणि आठ लोक जखमी झाले आहेत." (6.1 magnitude earthquake shakes Iran 3 killed quake shakes UAE)

इराणी प्रसारमाध्यमांनी भूकंपाची (EarthQuake) तीव्रता 6.1 सांगितली तर युरोपियन भूमध्य भूकंपशास्त्र केंद्र (EMSC) ने सांगितले की त्याची तीव्रता 6.0 एवढी होती. हा भूकंप 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होता, असे EMSC ने सांगितले आहे.

यूएईच्या विविध भागांतील रहिवाशांनाही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर मेटिऑरॉलॉजी (NCM) नुसार, दक्षिण इराणमध्ये सकाळी 1.32 वाजता भूकंपाची नोंद 10 किमी खोलीवर करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले पण त्याचा कोणताही वाईट परिणाम झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

Ponda: फोंडा पोटनिवडणुकीचा विषय 'दिल्ली'त! प्रदेशाध्यक्ष दामूंना पाचारण; उमेदवाराच्या नावावरून चर्चांना उधाण

Horoscope: अनपेक्षित घडामोडींसाठी तयार राहा, महत्वाच्या व्यक्तीशी भेट उपयोगी ठरेल; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

World Cup 2025 Final: क्रिकेटचं वेड! तिकिटाचा दर 1.3 लाखांहून अधिक, तरीही 'फायनल' पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईत तुफान गर्दी

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT