Prime Minister Shehbaz Sharif
Prime Minister Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पंतप्रधान शाहबाज शरीफ आक्रमक, आदेश देताच 17 गुन्हे दाखल तर 264 जणांना अटक

Pramod Yadav

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी निदर्शने करत त्याचा कडाडून विरोध केला. या निदर्शनात अनेकांना जीव गमवावा लागला. यानंतर शाहबाज शरीफ यांनी पीटीआय समर्थकांवर कारवाई सुरू केली आहे.

इम्रान खान नियाझी आणि त्यांचा जमाव कोणत्याही दहशतवादी किंवा राज्यविरोधी गटापेक्षा कमी नाही. असे वक्तव्य शनिवारी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले होते.

पाकिस्तानच्या पंजाब सरकारने पीटीआयच्या आंदोलकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत 264 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 78 जणांना जीएचक्यू रावळपिंडी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पंजाब सरकारने पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुन्हेगारांचा शोध घेतला. आता सरकार दंगलखोरांवर 17 गुन्हे दाखल करणार आहे. GHQ हल्ला प्रकरणी आतापर्यंत 78 लोकांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शनिवारी पंजाब सरकारला जिना हाऊस किंवा कॉर्प्स कमांडर हाऊसला आग लावणाऱ्या हल्लेखोरांना अटक करण्यासाठी 72 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना बुधवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून निमलष्करी रेंजर्सनी अटक केली. इम्रान खान भ्रष्टाचाराच्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी आले आणि त्यांची बायोमेट्रिक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

इम्रान खान यांच्या नाट्यमय अटकेनंतर, आंदोलकांनी आणि इम्रान खान समर्थकांनी पंजाब प्रांतातील 14 राज्य इमारती/आस्थापनांचे नुकसान करण्याबरोबरच 80 हून अधिक वाहनांची जाळपोळ केली आणि त्यांचे नुकसान केले. दरम्यान, पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ आक्रमक झाले असून, या हिंसाचारात सहभागी लोकांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

या सर्वांना कायदा आणि संविधानानुसार शिक्षा होईल, असे शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. या देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि सर्वस्व अर्पण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या स्मारकांवर, निवासस्थानांवर, कार्यालयांवर आणि शिबिरांवर हे हल्ला करतात. असेही शरीफ यांनी म्हटले.

दरम्यान, इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये मोठा हिंसाचार झाला, लोकांनी जाळपोळ करत सार्वजनिक मालमत्तेचे देखील नुकसान केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT