Tahavvur Rana Dainik Gomantak
ग्लोबल

26/11 Mumbai Attack: लवकरच तहव्वुर राणा भारताच्या ताब्यात

अमेरिकेने (America) मुंबई हल्ल्यामागील मास्टर माइंड आणि मुख्य आरोपी तहव्वुर राणाला (Tahavvur Rana) भारताकडे हस्तांतरित करण्याची मागणी कोर्टामध्ये केली आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेने (America) मुंबई हल्ल्यामागील मास्टर माइंड आणि मुख्य आरोपी तहव्वुर राणाला (Tahavvur Rana) भारताकडे हस्तांतरित करण्याची मागणी कोर्टामध्ये केली आहे. जो बायडेन प्रशासनाने (Biden Administration) लॉस एंजेलिसमधील फेडरल कोर्टाला विनंती केली आहे की, पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक असणाऱ्या राणाला भारताच्या ताब्यात द्याण्यात यावे. 2008 मध्ये मुंबईवर (2008 Mumbai terror attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सामील असल्याने राणा भारताकडे द्यावे. या हल्ल्यात अमेरिकन नागरिकांसह 166 लोक मृत्यूमुखी पावले होते .

59 वर्षीय तहावूर राणाला भारताने फरारी घोषित केला होता. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्याच्या सहभागावरुन भारतामध्ये त्याला अनेक आरोपांचा सामना करावा लागला होता. या हल्ल्य़ामध्ये अमेरिकी नागरिकांबरोबर 166 लोकांचा मृत्यू झाला होता. राणाला भारताकडे प्रत्यार्पण करण्यासंबंधी 10 जून 2020 रोजी लॉस एंजलिसमध्ये अटक करण्यात आली होती. लॉसएंजिलिसच्या मध्यवर्ती जिल्हा लॉस एंजेलिसमधील यूएस जिल्हा न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात अमेरिकन सरकारने असा युक्तिवाद केला आहे की, राणाच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीतील प्रत्येक फौजदारी आरोपासाठी भारताने पुरेसे पुरावे दिले आहेत.

प्रत्यार्पणाच्या सर्व आवश्यकता पूर्ण

गेल्या आठवड्यात, अमेरिकी वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, प्रत्यर्पण प्रमाणपत्राच्या सर्व आवश्यकता पूर्ण केल्या गेल्या आहेत. तहव्वुर हुसेन राणाच्या प्रत्यर्पणासाठी आणि कोठडीत पाठविण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. दुसरीकडे मात्र राणाच्या वकिलांनी त्याच्या प्रत्यार्पणाला विरोध दर्शविला आहे. यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे 15 जुलै रोजी न्यायालयासमोर सादर करण्यात आली. भारतातील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात सामील असल्याच्या आरोपावरुन राणा माफीचा साक्षीदार बनला होता. ऑगस्ट 2018 मध्ये त्याच्यासाठी भारतात वॉरंट जारी करण्यात आले होते.

डेव्हिड कोलमन हेडलीचा बालपणीचा मित्र राणा

तहवूर राणा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा बालपणीचा मित्र आहे. भारताच्या विनंतीवरून राणाला 10 जून 2020 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात सामील केल्याच्या आरोपाखाली लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा अटक करण्यात आली. भारताने त्याला पळ काढला आहे. पाकिस्तानी वंशाचा अमेरिकेचा 60 वर्षीय नागरिक हेडली 2008 च्या मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी होता. तो या प्रकरणातील साक्षीदार बनला आहे आणि अमेरिकेत हल्ल्याच्या भूमिकेसाठी सध्या तो 35 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT