Crime News   Dainik Gomantak
ग्लोबल

Shooting in America: क्षणात सगळं संपलं! आई-वडिलांसह भावंडांची गोळ्या झाडून हत्या; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

America Crime: अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिथे, एका 18 वर्षीय तरुणाला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Shooting in America: अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिथे, एका 18 वर्षीय तरुणाला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या तरुणाने त्याचे आई-वडील आणि दोन भावंडांची हत्या केल्याचा आरोप आहे.

कारण ते 'नरभक्षक' होते. विशेष म्हणजे, त्याला खाण्याची ते योजना आखत होते. सीझर ओलल्दे असे आरोपीचे (Accused) नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सीबीएस न्यूजनुसार, सीझर ओलल्दे याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. ओलल्दे याच्यावर त्याच्या पाच वर्षांच्या भावासह अनेकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

टेक्सास पोलिसांनी (Police) सांगितले की, त्यांना माहिती मिळाली होती की, ओलल्देच्या घरी एक व्यक्ती त्याच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचताच तेथील दृश्य पूर्णपणे वेगळे होते.

दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पाहिले की, तो व्यक्ती त्याच्या घरात बॅरिकेड करत होता. या व्यक्तीच्या हातात शस्त्रही होते. यानंतर पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले.

पोलीस घरात घुसले आणि ते दृश्य पाहून धक्काच बसला. घराच्या बाथरुममध्ये, ओलल्देचे वडील रुबेन आणि अॅडा गार्सिया, मोठी बहीण लिस्बेट आणि लहान भाऊ ऑलिव्हर यांचे मृतदेह पडले होते.

घराच्या वेगवेगळ्या भागात मारले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधमाने एका ठिकाणी कुटुंबीयांची हत्या केली नाही. घराच्या वेगवेगळ्या भागात कुटुंबातील सदस्यांना गोळ्या घालण्यात आल्या.

कारण बाथरुम व्यतिरिक्त घराच्या इतर भागात रक्ताचे थारोळे आढळून आले आहेत.

याशिवाय, रिकामी काडतुसेही पोलिसांना सापडली आहेत. सर्वांची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह बाथरुममध्ये ओढून नेले.

दुसरीकडे, घटना घडली त्यावेळी ओलल्देच्या घरी काम करणारी एक महिलाही घरात पोहोचली होती, तिने दार ठोठावले पण उत्तर मिळाले नाही, असे पोलीस अधिकाऱ्याला तपासात आढळून आले आहे.

यानंतर त्याने आपल्या एका साथीदाराला तिथे बोलावले. जबरदस्तीने घरात घुसले असता तो पहिल्यांदा ओलल्देच्या समोर आला.

नरभक्षक होते, मारण्याच्या बेतात होते

ओलल्देचा हवाला देत महिलेने पोलिसांना सांगितले की, त्याने त्याच्या कुटुंबाची हत्या केली कारण ते सर्व नरभक्षक होते आणि त्याला ठार मारुन खाण्याची योजना आखत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT