Pakistan Crime News Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानात 18 वर्षीय हिंदू मुलीची गोळ्या झाडून हत्या

अपहरणाचा गुन्हा अयशस्वी झाल्याने कृत्य, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रोही सुक्कूरची घटना.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान: पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. येथे सोमवारी एका 18 वर्षीय हिंदू मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपीने मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी न झाल्याने आरोपीने गोळ्या झाडून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. (18 year old girl shot and killed in Pakistan)

स्थानिक मीडियानुसार, हे प्रकरण आहे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रोही सुक्कूरचे. येथे पूजा ओडने हल्लेखोरांना विरोध केला, त्यानंतर तिला रस्त्याच्या मधोमध गोळ्या घातल्या. पाकिस्तानातील (Pakistan) अल्पसंख्याक, विशेषत: सिंधमधील हिंदू (Hindu) महिलांचे अपहरण केले जाते, त्यानंतर त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. पीपल्स कमिशन फॉर मायनॉरिटी राइट्स आणि सेंटर फॉर सोशल जस्टिसच्या म्हणण्यानुसार, 2013 ते 2019 दरम्यान जबरदस्तीने धर्मांतराची 156 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 2019 मध्ये, सिंध सरकारने सक्तीचे धर्मांतर आणि दुसऱ्या विवाहाविरोधात विधेयक आणण्याचा प्रयत्न केला. पण कट्टरवाद्यांनी त्याला विरोध केला.

ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स पाकिस्तानच्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 1.60% आहे. तर 6.51% हिंदू एकट्या सिंधमध्ये राहतात. पाकिस्तानमध्ये हिंदू हा प्रमुख अल्पसंख्याक समुदाय आहे. सरकारी आकडेवारीनुसार येथे 75 लाख हिंदू राहतात. मात्र, हिंदू समाजाचे म्हणणे आहे की त्यांची लोकसंख्या 9 दशलक्ष आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात सर्वाधिक हिंदू राहतात. येथे ते त्यांची संस्कृती आणि भाषा मुस्लिमांसोबत देवाणघेवाण करतात. पण हिंदू महिलांवरील अत्याचाराच्या बातम्याही याच प्रांतातून समोर येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT