Couple Dainik Gomantak
ग्लोबल

Love Story: भागलं! 78 वर्षीय शेतकऱ्याच्या प्रेमात 18 वर्षांची तरुणी

Relationships: सोशल मीडियावर दररोज अनेक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात.

दैनिक गोमन्तक

Trending News: सोशल मीडियावर दररोज अनेक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातच एका जोडप्याची प्रेमकहाणी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेली जात आहे. एका डिनर पार्टीमध्ये या जोडप्याची भेट झाली होती. 18 वर्षीय हलिमा अब्दुल्ला आणि 78 वर्षीय शेतकरी रशाद मंगाकोप यांना कल्पनाही नव्हती की, लवकरच दोघे एकमेकांच्या इतके जवळ येतील. 'द मिरर' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या नात्यासाठी सहमती दर्शवली आहे.

60 वर्षांचा फरक

वधू आणि वर यांच्या वयात 60 वर्षांचा फरक आहे. रशाद आणि हलिमाच्या म्हणण्यानुसार, ते यापूर्वी कधीही कोणाच्या प्रेमात पडले नाहीत. दोघेही काही वेळातच एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. वधू आणि वर दोघेही फिलिपाईन्सचे (Philippines) रहिवासी आहेत.

3 वर्षांनी लग्न झाले

लग्नसोहळ्यातील पहिल्या भेटीनंतर दोघेही 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाच्या (Marriage) निर्णयावर दोन्ही पक्षांच्या कुटुंबीयांनी वधू-वरांना पाठिंबा दिला.

व्हायरल प्रेम कथा

या जोडप्याची लव्हस्टोरी (Love Story) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्नानंतर या जोडप्याला लवकरात लवकर आपला संसार सुरु करायचा आहे. या दोघांनी इस्लामिक रितीरिवाजांनुसार लग्न केले. तथापि, फिलीपाईन्समध्ये वयाच्या अंतराने विवाह करणे सामान्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT