17 Indian Youth From Punjab And Haryana Rescued Trapped In Libya. Dainik Gomantak
ग्लोबल

Watch Video: मानवी तस्करांच्या तावडीतून सुटलेले 17 जण अखेर मायदेशी; नातेवाईकांना पाहताच अश्रू अनावर

Libiya: गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवत त्यांना इटलीला पाठवण्याच्या बहाण्याने ट्रॅव्हल एजंटांनी त्यांची फसवणूक करत लिबियात पाठवले, गेल्या सहा महिन्यांपासून ते तेथील तुरुंगात होते.

Ashutosh Masgaunde

17 Indian Youth From Punjab And Haryana Rescued Trapped In Libya:

लिबियातील त्रिपोली तुरुंगात असलेले १७ भारतीय तरुण सोमवारी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर ते भावूक झाले.

विमानतळावर पोहोचलेल्या तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांसाठी त्यांना इटलीला पाठवण्याच्या बहाण्याने ट्रॅव्हल एजंटांकडून फसवणूक केल्यानंतर ते गेल्या सहा महिन्यांपासून लिबियात अडकून पडले होते. एजंटांनी प्रत्येक व्यक्तीकडून 13 लाख रुपये घेतले होते.

अहवालानुसार, सर्व भारतीय तरुण फेब्रुवारी 2023 मध्ये दुबई आणि नंतर इजिप्त मार्गे इटलीसाठी निघाले. काही दिवसांनी इजिप्तमध्ये उतरल्यानंतर ते लिबियात आले.

राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनी सांगितले की, त्यांना मानवी तस्करांनी लिबियातील झुवारा शहरात ठेवले होते, जिथे त्यांना अन्न आणि पाणी सुद्धा मिळाले नाही. त्यांच्यावर हल्लेही करण्यात आले.

यापूर्वी, खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनी माहिती दिली की "गेल्या 6 महिन्यांपासून लिबियामध्ये माफियांच्या कैदेत अडकलेल्या 17 भारतीय मुलांची सुटका करण्यात आली आहे आणि त्यांना भारतात परत आणण्यात आले आहे."

खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनीच या तरुणांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू केली. साहनी यांनी 17 तरुणांच्या विमान तिकिटांचा खर्च केला आणि त्यांना नोकरीचे कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी लागणारा खर्चही आपण उचलणार असल्याचे आश्वासन दिले.

ट्रॅव्हल एजंटांवर कारवाईची मागणी

लिबियातील १७ तरुणांच्या मायदेशी परतल्याबद्दल आनंद व्यक्त करताना विक्रमजीत सिंह साहनी म्हणाले की, "अकालपुरख वाहेगुरुजींच्या आशीर्वादाने आम्ही पंजाब आणि हरियाणातील १७ तरुणांना लिबियातील माफियांच्या तावडीतून बाहेर काढण्यात यश मिळवले.

या 17 तरुणांना फसवत प्रत्येकाची 13 लाख रुपये फसवणूक करण्याऱ्या ट्रॅव्हल एजंटांवर तात्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

Goa Live News: कामुर्लीच्या उपसरपंच्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

SCROLL FOR NEXT