Temple Dainik Gomantak
ग्लोबल

या मुस्लिम देशात सापडले शेकडो वर्षे जुने मंदिर! पाहून तुम्हीही म्हणाल...

Syria Rare Discovery: सीरियातील पुरातत्व विभागाच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

Roman Era Mosaic Found In Syria: सीरियातील पुरातत्व विभागाच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. संशोधकांच्या चमूने सुमारे 1600 वर्षे जुनी जागा शोधून काढली असून तिथे मंदिर असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाने केलेल्या उत्खननात शतकानुशतके जुने ऐतिहासिक मोजेक शोधून काढले आहे. शास्त्रज्ञ याला दुर्मिळ शोध म्हणत आहेत. हे मोजेक रोमन काळातील असल्याचेही सांगितले जात आहे. या अतिशय सुंदर आणि अनोख्या मोजेकच वैशिष्टय म्हणजे 1600 वर्षांनंतरही अगदी नवे दिसत आहे.

युद्धग्रस्त सीरियामध्ये दुर्मिळ शोध

'बीबीसी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सीरियातील (Syria) तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होम्सजवळील रास्तानमध्ये हे मोजेक सापडले आहे. युद्धग्रस्त सीरियामध्ये दशकभर झालेल्या हल्ल्यांमुळे तेथील अनेक पुरातत्व खजिन्याचे नुकसान झाले आहे. या क्षणी या अनोख्या नमुन्याबद्दल बोलताना, या मोजेकमध्ये काही प्राचीन गोष्टीही अधोरेखीत केल्या गेल्या आहेत. हे मोजेक सुमारे 120 चौरस मीटर (म्हणजे 1300 चौरस फूट) पसरलेले आहे.

दुसरीकडे, मोजेक जुन्या इमारतीत होते. 11 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या युद्धानंतर सीरियामध्ये हा आतापर्यंतचा सर्वात खास शोध असल्याचे बोलले जात आहे. या मोजेकवर रोमन देवता देखील चित्रित केल्या आहेत. अशा स्थितीत इथे मंदिर (Temple) असावे असा अंदाज आता वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे, इथे राहणारे लोक रोमन देवतांची पूजा करत होते. ही प्रॉपर्टी चौथ्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे.

उत्खननाचे काम बाकी : संचालक

विभागाचे असोसिएट डायरेक्टर डॉ. ह्युमन साद यांच्या मते, या मोजेकमध्ये प्राचीन रोमन देव नेपच्यून आणि त्याच्या 40 साथीदारांचेही चित्रण आहे. डॉ. साद पुढे म्हणाले की, 'आतापर्यंत आम्हाला हे मोजेक कोणत्या प्रकारची इमारत आहे हे शोधून काढता आलेले नाही. उत्खननाचे काम अजून बाकी आहे, अशा परिस्थितीत आणखी काही दुर्मिळ गोष्टींसोबतच आणखी काही मोठे खुलासे होऊ शकतात.

मरणासन्न ऐतिहासिक अस्मिता जतन करण्याची मोहीम

एका दशकाहून अधिक काळातील लढाईत लाखो मूळ रहिवासी येथे विस्थापित झाले आहेत. 11 वर्षात उपासमार आणि आजारांमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रदीर्घ काळापासून युद्ध आणि उपासमारीच्या भीषणतेने ग्रासलेल्या या देशात झालेल्या लढाया आणि रक्तरंजित संघर्षांमध्ये देशाचा ऐतिहासिक वारसा नष्ट झाला. आता गेल्या काही वर्षांपासून येथील सरकार (Government) ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT