11 Indians Along With 16 sentenced in london Dainik Gomantak
ग्लोबल

लंडन, दुबई अन् 700 कोटी; परदेशात घोटाळे करणाऱ्या 11 भारतीयांची इनसाइड स्टोरी

Ashutosh Masgaunde

16 Convicts including 11 Indians involved in international money laundering and human trafficking have been sentenced in London:

आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग आणि मानवी तस्करीमध्ये गुंतलेल्या 11 भारतीयांसह 16 दोषींना लंडनमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. 11 भारतीयांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

खरं तर, इंग्लंडच्या नॅशनल क्राईम एजन्सी (NCA) च्या तपासात असे समोर आले आहे की 2017 ते 2019 दरम्यान दुबईला अनेकदा प्रवास करुन ब्रिटनमधून सुमारे 720 कोटी रुपये तस्करी करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारताशी संबंधीतअसल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी काहींनी काही काळापूर्वी भारत सोडला आहे.

एनसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गुन्हेगारांनी ड्रग्ज आणि प्रतिबंधित औषधे विकून आणि संघटित इमिग्रेशन गुन्ह्यातून हे पैसे मिळवले होते. एजन्सीला या लोकांची माहिती यूकेमधून कुरिअरद्वारे मिळाली. ज्यांच्याकडून दीड लाख पौंड जप्त करण्यात आले.

एजन्सीने सांगितले की हे आरोपी मानवी तस्करीसारखे गुन्हे करायचे. या संदर्भात, 2019 मध्ये, टायर ट्रान्सपोर्ट करणाऱ्या व्हॅनच्या माध्यमातून पाच मुले आणि एका गर्भवती महिलेसह 17 स्थलांतरितांची ब्रिटनमध्ये तस्करी झाल्याचे उघड झाले होते.

या आरोपींविरुद्ध क्रॉयडन क्राउन कोर्टात सुरू असलेली तीन दिवसांची सुनावणी नुकतीच संपली. यामध्ये मुख्य सूत्रधार चरणसिंगला साडे बारा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्याच्या जवळचा वलजीत सिंग याला 11 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

यामध्ये विश्वासू स्वंदर सिंग धल याला मानवी तस्करी केल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली, ज्यात मनी लाँड्रिंगसाठी 10 वर्षांचा समावेश होता. याशिवाय इतर सदस्यांनाही 11 महिने ते नऊ वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एजन्सीने आरोपींचे खाते तपासले असता पैसे कुठे गेले आणि केव्हा पाठवले गेले याची माहिती मिळाली. 2017 मध्ये सिंग आणि त्यांच्या कुरियरने दुबईच्या किमान 58 ट्रिप केल्या होत्या.

त्यानंतर पुढील अटक करण्यात आली आणि जानेवारी 2023 पासून क्रॉयडन क्राउन कोर्टात दोन खटल्यांमध्ये 16 लोकांवर आरोप ठेवण्यात आले आणि खटला चालवला गेला. एप्रिलमध्ये संपलेल्या पहिल्या खटल्यात सिंग यांच्यासह सहा जणांना मनी लाँड्रिंगप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

क्रॉयडन क्राउन कोर्टात तीन दिवस चाललेली शिक्षेची सुनावणी नुकतीच संपली. ज्यामध्ये चरणसिंग साडेबारा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली. त्याचा उजवा हात वलजीत सिंग याला 11 वर्षांचा तुरुंगवास, त्याचा विश्वासू लेफ्टनंट सवंदर सिंग धल याला मनी लाँड्रिंगसाठी 10 वर्षांचा तुरुंगवास आणि मानवी तस्करीसाठी अतिरिक्त पाच वर्षांची शिक्षा झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT