माकडांची तस्करी प्रकरणी पाकिस्तानातील कराची येथील दोघांना अटक करण्यात आली. चोरी प्रकरणी त्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी चक्क 14 माकडं पुरावा म्हणून न्यायालयात सादर केली, पण त्यापैकी एक माकड पळून गेले. आणि बाहेर झाडावर जाऊन बसले.
यामुळे न्यायालयात चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी माकडाला झाडावरून खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, दिवसभर या माकडाला ताब्यात घेण्यासाठी कर्मचारी झटत होते.
कराचीमध्ये गेल्या गुरुवारी दोन जणांना अटक करण्यात आली. आंब्याची निर्यात करण्यासाठी वापरल्या जाणार्या बॉक्समध्ये दोघे 14 माकडांची माकडांची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. शुक्रवारी या माकडांना न्यायालयात हजर केले असता, त्यातील एक पळून गेला, त्यानंतर त्याला पकडण्यासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते.
सिंध वन्यजीव विभागाचे प्रमुख जावेद महार यांनी याबाबत एका वृत्तपत्राला माहिती दिली आहे. माकडांना खोक्यात अत्यंत वाईट स्थितीत ठेवण्यात आले होते, त्यांना श्वास घेता येत नव्हता. पाकिस्तानमध्ये वन्य प्राण्यांचा व्यापार करणे किंवा पाळणे बेकायदेशीर आहे, परंतु नियमांचे नियमित उल्लंघन केल्याचे दिसून आले.
पाकिस्तानमध्ये विदेशी पाळीव प्राण्यांची मोठी बाजारपेठ आहे. रस्त्यावर मदारी म्हणून मनोरंजन करणारे त्यांच्यासोबत ही माकडं ठेवली जातात. त्यानंतर त्या माकडांना चोरी करण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. अशी माहिती समोर आली आहे.
न्यायालयाने दोघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, माकडांना कराची प्राणिसंग्रहालयाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्याने सांगितले की, माकडांना जेथून पकडले होते तेथून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत द्यायला हवे होते.
पाकिस्तानचे प्राणीसंग्रहालयात सुविधा अत्यंत खराब आहेत. 2020 मध्ये, एका न्यायालयाने देशाच्या राजधानीतील एकमेव प्राणीसंग्रहालयाच्या खराब स्थितीमुळे बंद करण्याचे आदेश दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.