Louvre Museum  Louvre Museum Jewelry Theft
ग्लोबल

7 मिनिटांत 850 कोटींचा दरोडा, नेपोलियन बोनापार्टच्या बायकोचे दागिने केले लंपास; जगप्रसिद्ध लूव्र म्युझियम चोरीप्रकरणी दोघे अटकेत!

Louvre Museum Jewelry Theft: पॅरिस पोलिसांनी या चोरीशी संबंधित काही संशयितांना ताब्यात घेतले, मात्र त्यांची नावे उघड केली नाहीत.

Manish Jadhav

Louvre Museum Case: पॅरिसमधील जगप्रसिद्ध लूव्र म्युझियम (Louvre Museum) मधील सुमारे 102 मिलियन डॉलर (सुमारे 850 कोटी) किमतीच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी फ्रान्सच्या पोलिसांना मोठे यश मिळाले. फ्रान्स पोलिसांनी शनिवारी (25 ऑक्टोबर) रात्री उशिरा या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

पॅरिस पोलिसांनी या चोरीशी संबंधित काही संशयितांना ताब्यात घेतले, मात्र त्यांची नावे उघड केली नाहीत. फ्रान्समधील एका स्थानिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, यातील पहिला आरोपी रात्री सुमारे 10 वाजता चार्ल्स डी गॉल विमानतळावर पकडला गेला, जेव्हा तो देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. तर, दुसऱ्या आरोपीला पॅरिसच्या उत्तरेकडील सीन-सेंट-डेनिस नावाच्या परिसरातून अटक करण्यात आली. अटक केलेले दोन्ही आरोपी सुमारे 30 वर्षांचे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे म्युझियममध्ये चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीतील सदस्य असल्याचा संशय आहे.

7 मिनिटांत चोरी

चोरांनी चोरी केलेल्या एका मूव्हिंग ट्रक आणि त्याच्या लांब शिडीचा वापर करुन म्युझियमच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या 7 मिनिटांत (Seven Minutes) चोरट्यांना ही चोरी केली. यादरम्यान पळून जाताना त्यांनी हिरे आणि पाचूने (Emeralds) जडलेला एक मौल्यवान मुकुट (Tiara) खाली पाडला, पण आठ अत्यंत मौल्यवान दागिने घेऊन ते पळून गेले. या चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये नेपोलियन बोनापार्टने आपली पत्नी राणी मेरी-लुईझला दिलेला पाचू आणि हिऱ्यांचा हार देखील समाविष्ट आहे.

लूव्र म्युझियममधील जुन्या चोऱ्या

10 ऑगस्ट 1793 रोजी स्थापन झालेल्या लूव्र म्युझियममध्ये यापूर्वीही अनेकदा चोऱ्या झाल्या आहेत. सर्वात पहिली आणि सर्वात गाजलेली चोरी ऑगस्ट 1911 मध्ये झाली होती, जेव्हा प्रसिद्ध चित्रकला 'मोना लिसा' (Mona Lisa) चोरली गेली होती. म्युझियममध्ये काम करणाऱ्या विन्चेन्झो पेरुजिया नावाच्या व्यक्तीने ही चोरी केली होती. हे पेंटिंग दोन वर्षांनंतर इटलीतील फ्लोरेंस शहरात मिळाले होते. याशिवाय, मे 1983 मध्ये लूव्र म्युझियममधून रेनेसा-काळातले दोन मौल्यवान चिलखती सूटही चोरीला गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ritika Sajdeh: रितिका सजदेहची लक्झरी चॉईस! मुंबईत खरेदी केलं नवीन आलिशान घर; किंमत तब्बल 'इतके' कोटी

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT