King Charles Coronation Dainik Gomantak
ग्लोबल

King Charles III Coronation Ceremony: 1000 कोटींचा खर्च, 2.5 किलो सोन्याचा मुकुट... जनताच करणार ब्रिटनच्या राजाचा राज्याभिषेक

'या' दिवशी होणार राज्याभिषेक; संपूर्ण जबाबदारी नागरिकांवर

Akshay Nirmale

King Charles III Coronation Ceremony: ब्रिटनचे राजे तिसरे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू झाली आहे. हा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण आठवडा चालेल.

यादरम्यान ब्रिटनमध्ये उत्सवासारखे वातावरण असणार आहे. तथापि, या सोहळ्याची मोठी 'किंमत' ब्रिटिश जनतेला मोजावी लागणार आहे. खरे तर शाही विवाहसोहळ्यांचा खर्च रॉयल पॅलेस उचलतो, पण राज्याभिषेकाची संपूर्ण जबाबदारी नागरिकांवर असते.

या वर्षी, एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. 6 मे रोजी चार्ल्स अधिकृतपणे ब्रिटनचे राजे बनतील. हा राज्याभिषेक संपूर्ण जगासाठी एक मोठा सोहळा असणार आहे.

यावेळी राजा आणि राणीला मुकूट परिधान केला जातो आणि या राज्याभिषेकप्रसंगी प्रेक्षकांमधून 'गॉड सेव्ह द किंग' म्हणून जयघोष करतील.

सध्या ब्रिटनला महागाईचे चटके बसू लागले आहेत. अनेक लोक अन्नासाठी फूड बँकेवर अवलंबून आहेत. संपुर्ण देशच गरीबीच्या समस्येशी झुंजत असताना या भव्य सोहळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. राज्याभिषेकासाठी सुमारे शंभर दशलक्ष पौंड (हजार कोटी) खर्च येईल, असा अंदाज आहे.

हा सोहळा देशाची जबाबदारी असल्याने त्याचा खर्चही करदात्यांनीच उचलला आहे. याआधी 1953 मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्याभिषेकात ब्रिटिश सरकारने सुमारे दीड लाख पौंड खर्च केले होते. आज त्याची किंमत 500 कोटी रूपये होते.

करदात्यांसमोरील समस्या माहिती असल्याने ऑपरेशन गोल्डन ऑर्ब या राज्याभिषेकाचे आयोजन करणाऱ्या समितीने म्हटले आहे की, समारंभ लहान करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु सुरक्षेवर खर्च करावा लागेल. प्रत्यक्षात ही संपूर्ण प्रक्रिया काही तासांची असेल, ज्यामध्ये २ हजारांहून अधिक पाहुणे येतील.

हा सोहळा टीव्हीवर दाखवला जाईल, त्याचे सर्व अधिकार ब्रिटिश सरकारकडे असतील. याशिवाय पर्यटनही वाढेल. इतर देशांतून येणाऱ्या नेत्यांशिवाय अनेक सर्वसामान्य लोकही राज्याभिषेक पाहण्यासाठी किंवा कव्हर करण्यासाठी येणार आहेत.

त्यासाठी हॉटेल्सनीही खूप आधी बुकिंग सुरू केले आहे. यातून येणारा पैसा हजार कोटींहून अधिक असेल आणि करदात्यांना फारसा त्रास होणार नाही, असा अंदाज आहे.

राज्याभिषेकात काय होते?

ब्रिटनचा हा सोहळा युरोप आणि जवळपास संपूर्ण जगामध्ये अनोखा आणि भव्य सोहळा आहे. यादरम्यान राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला घोड्यावरून काढलेल्या रथावर सुमारे 40 मिनिटे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी चालतील. या रथात इलेक्ट्रिक खिडक्या आणि एसीही असतील.

राजवाड्यात आगमन झाल्यावर राजाला 700 वर्ष जुन्या खुर्चीवर बसवले जाईल, त्यानंतर पवित्र पाण्याने अभिषेक केला जाईल आणि मुकुट परिधान केला जाईल. यादरम्यान 7 विविध प्रकारचे सूर वाजवून लष्कराची सलामी दिली जाणार आहे.

राजा कोणता मुकुट घालणार?

या वेळी किंग चार्ल्स यांना सोन्याचा मुकूट परिधान केला जाईल. हा मुकूट 17 व्या शतकातील सेंट एडवर्ड्स क्राउन आहे. सुमारे अडीच किलो वजनाचा हा मुकुट केवळ राज्याभिषेकावेळी परिधान केला जातो.

याशिवाय आणखी एक मुकुट असेल, ज्याला इम्पीरियल स्टेट क्राउन म्हणतात. तो राज्याभिषेकाच्या शेवटी परिधान केला जाईल. किंग चार्ल्स जेव्हा बकिंगहॅम पॅलेसच्या बाल्कनीत येतील तेव्हा हाच मुकुट त्यांच्या डोक्यावर असेल. हा मुकूट देखील सोन्याचा आहे. यात 2500 हून अधिक हिरे, सुमारे 300 मोती, 4 माणिक आणि अनेक मौल्यवान रत्ने जडलेली आहेत.

हा मुकूट लंडनच्या क्राऊन टॉवरमध्ये प्रदर्शनासाठी ठेवला होता, मात्र सध्या तो समारंभांसाठी आणला आहे. हे मौल्यवान मुकुट राजकीयदृष्ट्या खूप शक्तिशाली मानले जातात. जगातील फक्त तीन लोक या मुकूटांना स्पर्श करू शकतात.

सध्याचे राजा-राणी, कँटरबरीचे आर्चबिशप आणि रॉयल क्राउन ज्वेलर्स. हे ज्वेलर्स पिढ्यानपिढ्या राजघराण्यातील दागिन्यांचा व्यवहार करतात. राज्याभिषेकापूर्वी मुकुट जुळवण्याचे कामही त्यांच्याकडे आहे. दरम्यान, यावेळी राणी कॅमिला यांचाही क्वीन मेरी म्हणून राज्याभिषेक होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT