Russia Dainik Gomantak
ग्लोबल

रशियन सैन्याकडून 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; युक्रेनियन खासदाराचा आरोप

रशियन सैनिकांनी अगदी 10 वर्षांच्या मुलींवर बलात्कार केले तसंच महिलांच्या शरीरावर डाग लावल्याचा आरोप युक्रेनच्या खासदार लेसिया बॅसिलेन्क यांनी ट्विटरवरून केला.

दैनिक गोमन्तक

रशियन (Russia) सैनिकांनी अगदी 10 वर्षांच्या मुलींवर बलात्कार केले तसंच महिलांच्या शरीरावर डाग लावल्याचा आरोप युक्रेनच्या खासदार लेसिया बॅसिलेन्क यांनी ट्विटरवरून केला. या सैनिकांनी महिला आणि मुलींच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली असून क्रूर अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. (10 year old girl raped by Russian troops Accusation of Ukrainian MP)

तरुण आणि लहान मुलींच्या योनीमार्ग आणि गुदमार्गाची अक्षरशः चिरफाड करण्यात आली असून महिलांच्या शरीरावर लोखंडी सळया तापवून त्यांच्या शरिरावर डाग देण्यात आले आहेत. हे डाग स्वस्तिक या भारतीय प्रतिकासारख्या दिसणाऱ्या चिन्हाप्रमाणे दिसत असल्याचंही लेसिया यांनी म्हटलं. त्यांनी यासोबत एक फोटोही शेअर केला गेला आहे. लेसिया यांनी सांगितले की रशियन सैन्य युक्रेनमध्ये लोकांची लूट, बलात्कार आणि हत्या करत होते आणि रशियाला “अनैतिक गुन्ह्यांचे राष्ट्र” म्हणून संबोधले आहे.

रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केले आणि तेव्हापासून देशभरात हल्ले सुरू झाले आहेत. या युद्धात हजारो नागरिक आणि सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर चार लाख लोक विस्थापित झाले. रशियाने गेल्या आठवड्यात घोषणा केली की ते राजधानी कीवच्या आसपासच्या प्रदेशातून माघार घेतील आणि युक्रेनच्या पूर्वेकडील भागांवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यांच्या माघारच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी विनाशाचा माग सोडला. युक्रेनच्या बुचामध्ये, अनेक मृतदेह शहराभोवती पसरलेले गेले होते. युक्रेनने रशियावर युद्ध गुन्हे केल्याचा आरोप केला तर रशियाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT