Lord Ganesha Dainik gomatak
ganesh chaturthi festival

राज्यात सर्वत्र मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन

अनंत चतुर्दशीपर्यंत घरोघरी घुमणार घुमट, समेळ अन् कासाळ

दैनिक गोमन्तक

संकटमोचक, विघ्नहर्ता श्री गणेशाचे आज घरोघरी आगमन झाले असून राज्यभरात गणेश चतुर्थीनिमित्ताने सर्वत्र आनंदी आणि उर्जादायी वातावरण आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागत अबालवृद्ध ठिकठिकाणी धुमधडाक्यात करत आहेत. राज्यात सर्वत्र बाजार पेठा अन् चित्रशाळांमध्ये ही लगबग पहायला मिळत आहे.

(ganesh chaturthi : Arrival of Lord Ganesha from house to house in Goa)

Lord Ganesha

कोरोना संसर्गामूळे गेले दोन वर्ष उत्सवावर मर्यादा होत्या. यंदा मात्र पहिल्यांदाच काहीशा निव्वळलेल्या वातावरणामुळे राज्यात श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत होत आहे. राज्यभरातील चित्रशाळांमधून आज मंगळवारपासूनच भाविकांनी ‘बाप्पा’ला घरी नेत प्रतिष्ठापणा करण्याची तयारी सुरू केली आहे. आज प्रत्येकाच्या घराघरात, मंडपा-मंडपात मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने श्री गणरायांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे.

कोरोना महामारीमुळे अनेक सण-उत्सवावर बंधने घालावी लागली. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करता आला नाही. कारण सर्वांच्या आरोग्याचा प्रश्‍न होता. मात्र यंदा घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशोत्सवाला भक्तीचा नवा जोश आला आहे. तसेच गेल्या दोन वर्षानंतर एकत्रित जोश या चतुर्थीत दिसून येत आहे.

Lord Ganesha

अनंत चतुर्दशीपर्यंत घरोघरी घुमणार घुमट, समेळ आणि कासाळ

घराघरांधून आणि सार्वजनिक गणपती समोर घुमट, समेळ आणि कासाळचा आवाज घुमणार आहे. या मंगलमयी वाचावरणात गणरायांच्या आरत्यांबरोबर भजनांची तल्लीनता वाढणार आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत भाविक आपापल्या परीने बाप्पाची मनोभावे सेवा करतील. काहींच्या घरी दीड तर काहींच्या घरी तो 21 दिवस विराजमान असेल. पण बहुतांश ठिकाणी गणराया पाच दिवस असणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस घुमटाच्या सुमधूर आवाजाने वातावरण भक्तिमय बनणार आहे.

Lord Ganesha

माटोळीची तयारीला बाप्पाच्या आगमणाने पुर्णविराम

गोमंतकीय चतुर्थाचे खास वैशिष्ट्ये असते ती माटोळी. श्रींच्या मूर्तीवर ही पारंपारिक माटोळी बांधण्याची परंपरा आहे. आपल्या भोवताली मिळणारी फळे, फुले, भाज्या, वेली, कंदमुळे इत्यादी नैसर्गिक घटकांनी बनवलेल्या माटोळी हे प्रमुख आकर्षण असते. यंदाही या माटोळी साहित्यांसाठी भरलेल्या बाजारांमधून साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसत होती. यामाटोळीची तयारीला आज बाप्पाच्या आगमणाने पुर्णविराम मिळाला आहे.

रंगबेरंगी रांगोळी अन् सजावटीने उत्साहात भर

चतुर्थीमध्ये फटाके फोडण्याची परंपरा असून यासाठी बाजारात फटाके, फुलबाजे, सुतळी बॉम्ब, आऊट यासारख्या गोष्टी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. सजावटीसाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अनेक आकर्षक वस्तुंची खरेदी केली. गणपतीची ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्या ठिकाणी प्रसन्न वातावरण रहावे म्हणून सजावटीचे साहित्य अनेक भक्तांनी खरेदी केले होते. यात कागदी फुले, कागदी मखर, विविध प्रकारची खेळणी, लाकडी चौरंग, विविध प्रकारच्या रंगबेरंगी रांगोळीचा समावेश होता. सजावटीचे साहित्य श्री गणेश चतुर्थीनिमित्त महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

बाप्पाच्या आगमनानिमित्त घरोघरी विविध पदार्थांची रेलचेल

बाप्पाच्या आगमनानिमित्त घरोघरी विविध पदार्थांची रेलचेल असते. यात नेवऱ्या (करंज्या), मोदक, शेव, गोडीशेव, चिवडा, चकल्या, शंकरपाळे आदी पदार्थांचा समावेश आहे. दुसरीकडे यासाठी मिठाई दुकानेही सजली असली असून विविध पदार्थांपासून बनविलेले मोदक, बाप्पाचे आवडते लाडू, काजू लाडू, बुंदी लाडू, खोबरे आणि ड्रायफ्रुट लाडू इत्यादी पदार्थ नागरिक एकमेकांना भेटस्वरुपात देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

SCROLL FOR NEXT