Zabiullah Mujahid: We will fight for the Jammu-Kashmir's Muslims  Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीर मधील मुस्लिमांसाठी आम्ही लढू: तालिबान

झबीहुल्ला मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांनीआंतरराष्ट्रीय समुदायासमोर अफगाणिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानचे कौतुक केले आहे .

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानचे उपसूचना मंत्री आणि तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांनी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर अफगाणिस्तानला (Afghanistan) पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानचे (Pakistan) कौतुक केले आहे . पीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मुजाहिद म्हणाले की, पाकिस्तान अफगाणिस्तानबद्दल आवाज उठवत आहे आणि आंतरराष्ट्रीय शक्तींना अफगाणिस्तानमध्ये सामील होण्याचे आवाहन करत आहे. यासोबतच जबीहुल्ला मुजाहिद यांनी काश्मीर (Jammu-Kashmir) संदर्भातहि विधान केले आहे. (Zabiullah Mujahid: We will fight for the Jammu-Kashmir's Muslims)

अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने (Taliban) म्हटले होते की काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे, पण त्यानंतर तालिबान कडून असे वक्तव्यही करण्यात आले की तालिबान काश्मीरच्या दुःखी मुस्लिमांसाठी आवाज उठवत राहील. जबीहुल्ला मुजाहिद यांनी आता पुन्हा एकदा या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की संपूर्ण जगात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे मुस्लिमांना अन्यायकारक वागणूक दिली जात आहे, मग ते पॅलेस्टाईन, काश्मीर किंवा म्यानमार असो.

ते पुढे म्हणाले की, जिथे मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, ते चिंताजनक आहे आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत. जम्मू -काश्मीरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनावरही आम्ही टीका करतो. ते म्हणाले की, अफगाणिस्तान सरकार जगाच्या वेगवेगळ्या भागातील पीडित मुस्लिमांना राजनैतिक आणि राजकीय मदत पुरवत राहील.

पाकिस्तान हा आपला शेजारी असून अफगाणिस्तानबाबत पाकिस्तानच्या वृत्तीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असे जबीहुल्लाह म्हणाले. अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाशी चांगले संबंध हवे आहेत. व्यापार आणि आर्थिक संबंध वाढवायचे आहे. आम्हाला आशा आहे की आमचे शेजारी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर अफगाणिस्तानला समर्थन देत राहतील.मुजाहिद म्हणाले की, 'अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि अमेरिकेसमोर आमच्या बाजूने आवाज उठवला आहे. कतार, उझबेकिस्तान आणि इतर देशांनीही अफगाणिस्तानबाबत सकारात्मक दृष्टीकोन घेतला आहे. सहा दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्र महासभेत चीन आणि रशियाही आमच्या बाजूने बोलले. अफगाणिस्तानचे संबंध केवळ त्याच्या शेजारील देशांबरोबरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय समुदायाशी देखील खूप महत्वाचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

Bangladesh Violence: बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीना विरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार; भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

SCROLL FOR NEXT