Viral Video ANI
देश

Viral Video: चिमुकल्याला हवा PM मोदींचा आशीर्वाद ! YSR काँग्रेसच्या महिला खासदार तान्ह्या बाळाला घेऊन पोहचल्या संसदेत...

Manish Jadhav

Parliament Budget Session: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लोकांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो. सोशल मीडियावर असे व्हिडिओ सर्रास पाहायला मिळतात. पण 100 पैकी एकच व्हिडिओ असा असतो जो पाहिल्यानंतर आपण सुखावून जातो. असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही भावूक व्हाल. चला तर मग या व्हिडिओबद्दल जाणून घेऊया...

दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. संसदेत अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासाना पाहायला मिळाले. दरम्यान, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदार माधवी गोदेती यांचा एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या आपल्या बाळाला घेऊन संसदेत आल्याच्या दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्या आपल्या बाळाला पंतप्रधान मोदींना भेटवण्यासाठी संसदेत घेऊन आल्या आहेत.

दुसरीकडे, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर माधवी गोदेती आंध्र प्रदेशातील अराकू येथून लोकसभेवर निवडून आल्या. आंध्र प्रदेशातील त्या सर्वात तरुण खासदार आहेत. त्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय गोदेती डेमुडू हे कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT