Viral News Dainik Gomantak
देश

Viral News: प्रेयसीचे लग्न थांबवण्यासाठी केली स्वतःची हत्या ? यूपीतील घटनेने सर्वत्र खळबळ

यूपीच्या संभल जिल्ह्यातील असमोली पोलीस स्टेशन हद्दीतील शबाजपूर काला गावातील ही घटना आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

यूपीच्या संभलमध्ये आपल्या प्रेयसीचे लग्न रोखण्यासाठी एका तरुणाने स्वतःच्याच अपहरणाची आणि नंतर हत्येचा बनाव रचला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून त्यामध्ये तरुणाचे हातपाय बांधलेले आहेत तर, त्याच्या तोंडावर रक्ताचे डाग दिसत असून, जीभ बाहेर लटकलेली दिसत आहे.

पोलिसांनी दिवसरात्र एक करून तरुणाचा शोध घेतला, नंतर बेपत्ता तरुण त्याच्या बहिणीच्या घरी सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणाचा खुलासा केला. सध्या तरुणाची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.

यूपीच्या संभल जिल्ह्यातील असमोली पोलीस स्टेशन हद्दीतील शबाजपूर काला गावातील ही घटना आहे. वसीमचे गावातील एका तरुणीसोबत गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या घरच्यांनाही त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती होती.

वसीम आणि मुलीच्या घरातील सदस्य वेगवेगळ्या भाऊबंदकीमुळे लग्नाला राजी नव्हते. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे दुस-या तरुणासोबत लग्न ठरवले, 24 एप्रिल रोजी मुलीचे लग्न होणार होते.

मात्र, वसीमला आपल्या प्रेयसीला दुसऱ्याशी लग्न करू द्यायचे नव्हते. यासाठी प्रेयसीचे लग्न रोखण्यासाठी त्याने प्रेयसीच्या कुटुंबीयांना स्वतःच्याच अपहरणाची आणि खुनाचा बनाव केला.

प्रेयसीचे 24 एप्रिल रोजी लग्न होणार होते. 23 एप्रिल रोजी सायंकाळी वसीम घरातून निघून गेला होता, मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. रात्री वसीमचा लहान भाऊ शारिकचा व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ आला. वसीमचे हात पाय दोरीने बांधलेले असून चेहऱ्यावर रक्त होते. जीभ बाहेर लटकली होती. व्हिडिओ पाहिल्यानंतर कुटुंबात हाहाकार माजला. वसीमचा खून झाला असावा असे सर्वांना वाटत होते.

यानंतर कुटुंबीयांनी असमोली पोलीस ठाणे गाठून प्रेयसीच्या कुटुंबीयांवर वसीमची हत्या केल्याचा आरोप केला. यासोबतच वसीमचा व्हिडिओही दाखवण्यात आला.

वसीम सापडला नाही

असमोली पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली, मात्र वसीमबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. यानंतर पोलीस ठाण्याने कुटुंबीयांसह वसीमचा मृतदेह शोधण्यासाठी जंगलात शोध सुरू केला. 23 एप्रिलच्या रात्रीपासून 24 एप्रिलच्या सकाळपर्यंत वसीमचा शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही.

वसीम बहिणीच्या घरी होता

यादरम्यान कुटुंबीयांनी मुरादाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या वसीमच्या बहिणीला तिच्या भावाची हत्या झाल्याचे सांगितले. दरम्यान, वसीम ठीक असून माझ्या घरी आहे, असे त्याने कुटुंबीयांना सांगितले. याची माहिती मिळताच वसीमच्या नातेवाईकांनी असमोली पोलीस ठाण्यासह त्याचे घर गाठले. पोलिसांनी वसीमला त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT