Crime News  Dainik Gomantak
देश

‘तुमच्या आईचा आज मृत्यू होणार’; पतीने मुलांसमोर पत्नीला जिवंत जाळले

Hyderabad Crime News: पोलिसांनी याप्रकरणी ३२ वर्षीय तिच्या पतीला अटक केली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या आरोपीचे के. व्यंकटेश असे नाव आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

हैदराबाद: क्रूरपणाची परिसिमा पार करणारी अत्यंत वेदनादायी घटना हैदराबादमधून समोर आली आहे. पतीने पत्नीला जिंवत जाळल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (२४ डिसेंबर) टिळक नगर येथे घडला. धक्कादायक बाब म्हणजे पतीने पत्नीला जिवंत जाळले त्यावेळी त्यांची मुले समोरच उभी होती.

चित्याला त्रिवेणी असे मृत महिलेचे नाव आहे. महिला हॉटेल कामगार असल्याचे तपासात समोर आले आहे. गांधीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तिथेच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी ३२ वर्षीय तिच्या पतीला अटक केली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या आरोपीचे के. व्यंकटेश असे नाव आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. पती – पत्नी काही दिवसांपूर्वी हुजूर नगर येथून हैदराबादमध्ये स्थलांतरीत झाले होते. त्यांना नरेश आणि साथविका अशी दोन मुले आहेत. संशयित पती व्यंकटेश पत्नीवर संशय घेऊन तिचा छळ करत होता, असा आरोप मृत महिलेच्या पालकांनी केला आहे.

बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास व्यंकटेशच्या घरातून धूर येत असल्याचे फूड डिलिव्हरी बॉयला दिसले. यानंतर बॉयने शेजारील नागरिकांनी घटनेची माहिती दिली. बॉयने घरात प्रवेश केला त्यावेळी त्रिवेणी आगीत होरपळत होती. यानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिकेला फोन करुन तिला रुग्णालयात हलविण्यासाठी लगबग केली.

दरम्यान, रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी तपास केला असता, मुलगा नरेश यांनी घटनेची माहिती. संशयित व्यंकटेश पहाटे उठल्यानंतर त्याने समोसा आणून दिला व तुझी आई आज मरणार, असे सांगितले, अशी माहिती नरेशने पोलिसांनी दिली. संशयितांनी सकाळीच पेट्रोलची बॉटल सोबत आणली होती, असेही नरेशने सांगितले.

आई किंचाळत असल्याचे पाहून मुलगी झोपेतून उठली. मुलगा नरेशने आईच्या अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न केला पण, त्याला यश आले नाही. पोलिसांनी संशयित व्यंकटेशला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bollywood Big Releases 2026: धुरंधर काहीच नाही! 2026 मध्ये बॉलिवूडचा धमाका; 'धर्मेंद्र' यांचा शेवटचा सिनेमा होणार 1 जानेवारीला प्रदर्शित

गोवा आग दुर्घटना! नाईटक्लब मालक लुथरा बंधुंचा जेलमधील मुक्काम वाढला, पोलिस कोठडीत चार दिवस वाढ

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग हाऊसफुल! 31 डिसेंबरसाठी पर्यटक पडले बाहेर; गोवा-कोकणाकडे वळली पावले

Viral Post: "मला जो गोवा आवडतो, तसा तो राहिला नाही"! सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत; स्थानिक म्हणाला, 'आम्ही रोज या परिस्थितीला तोंड देतोय'

Minor girl Assault: नराधम बस चालकाचे घृणास्पद कृत्य! 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपी बक्षीला 4 दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT