Court Dainik Gomantak
देश

न्यायालयाचा निर्णय ऐकताच तरुणाने कापून घेतली हाताची नस

दैनिक गोमन्तक

केरळमध्ये एका हिबिअस कॉर्पस केसच्या सुनावणीदरम्यान एका तरुणाने आपल्याची हाताची नस कापून घेत स्वत:च्या जीवाला नुकसान पोहचवल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, न्यायाधीश अनु शिवारामन यांच्या चेंबर बाहेर ही घटना घडली.

काय आहे प्रकरण?

केरळ मध्ये एक तरुण आणि एक तरुणी एक महिन्यापासून एकत्र राहत होते. मात्र त्यानंतर मुलीच्या वडीलांनी तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगत हिबिअस कॉर्पसची केस दाखल केली होती. त्यांनी असेही म्हटले होते की तिला जबरदस्तीने पळवून नेले आहे. त्यानंतर न्यायाधीश अनु शिवारामन आणि न्यायाधीश सी जयाचंद्रन यांच्या बेंचने या केसची सुनावणी केली आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्ष हजर होते.

यावेळी मुलीने आरोपी तरुणाबरोबर राहण्यास नकार दिला असून मी जबरदस्तीने राहत असल्याचे आपल्या जबाबात म्हटले आहे. आरोपीने मी जर त्याच्याबरोबर राहिले नाही तर तो स्वत: चा जीवास नुकसान पोहचवण्याची धमकी दिली होती.

त्यामुळे मी त्याच्यासोबत एक महिना राहिले मात्र आता मला माझ्या कुटुंबाबरोबरच राहायचे आहे. मला इतर कोणत्याही भावना या मुलाबद्दल नाहीत असे पीडीत मुलीने म्हटले आहे.

आरोपी मुलगा या मुलीला आपली गर्लफ्रेंड असल्याचे सांगत होता. मात्र दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी सुनावणी करताना मुलीला तिच्या कुटुंबियांबरोबर जाण्याची परवानगी दिली आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर या मुलाने बाहेर जात न्यायाधीशांच्या चेंबर बाहेरच चाकूने आपला हाताची नस कापून घेतली. त्यानंतर तो गळ्याकडेदेखील चाकू नेत स्वत:चा जीव घेण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे उपस्थित असलेल्या पोलिसां( Police )नी तप्तरता दाखवत चाकू त्याच्याकडून काढून घेतला आणि त्याला जवळच्या दवाखान्यात दाखल केले आहे. आता त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेपूर्वी मुलीने स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षेविषयी न्यायालयात काळजी व्यक्त केली होती. आता या घटनेनंतर न्यायालयाने पोलिसांना पीडीत मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना संरक्षण दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT