Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: निर्दयतेचा कळस! झोपलेल्या कुत्र्याला ठार केलं; भुकेलेली पिल्लं आईला बिलगली

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून ह्रदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका तरुणाने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime:

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून ह्रदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका तरुणाने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने एका श्वानाला रस्त्याच्या कडेला आपल्या पिल्लांना पाजत असताना काठीने मारहाण केली. तरुणाचे हे शैतानी कृत्य शेजारी लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही घटना कानपूरमधील चकेरी भागात पॅक मोडजवळ घडली.

दरम्यान, रस्त्याच्या कडेला एक श्वान आपल्या पिल्लांना दूध पाजत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. जवळच दुसरे एक श्वान उभे आहे आणि एक तरुण त्याच्याशी खेळत आहे. त्यानंतर मागून दुसरा तरुण हातात जाडजूड काठी घेऊन तिथे पोहोचला आणि त्याने पिल्लांना दूध पाजणाऱ्या श्वानावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे त्या श्वानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे

आश्चर्याची बाब म्हणजे घटनास्थळी अनेक लोक उभे होते, मात्र कोणीही त्याला थांबवण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न केला नाही. श्वानाला मारल्यानंतर तरुण तेथून निघून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यानंतर प्राणी संघटनेच्या वतीने चकेरी पोलीस (Police) ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार आहे.

आरोपी तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल

एडीसीपी लखन सिंह यादव यांनी सांगितले की, प्राणी संघटनेच्या वतीने एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे, तरुणाने श्वानाला निर्दयीपणे मारले असून त्याचा शोध सुरु आहे. ही घटना सोमवारी घडली. या घटनेचे फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT