Headphones Blast  Dainik Gomantak
देश

कानात हेडफोनचा स्पोट झाल्याने तरुणाचा मृत्यू

राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यात Bluetooth Headphonesचा कानात स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

वेगवेळ्या कंपन्यांचे ब्रेंडेड हेडफोन्स वापरण्याची सध्या तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यामध्ये स्टायलीश ब्लुटूथ हेडफोन्स वापरणारे भरपुर तरुण आपल्याला पहायला मिळतात. मात्र हे आता धोकादायक ठरत असल्याचे पहायला मिळते आहे. राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यात ब्लूटूथ हेडफोनचा कानात स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर पोलिसांनी शनिवारी सांगितले की, अपघातात बळी पडलेला 28 वर्षीय तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. चौमु शहरातील उदयपुरिया गावात ही घटना घडल्याचे समजते आहे. (Young man dies after headphones explode in ears)

ही घटना ज्यावेळी झाली, त्यावेळी राकेश कुमार घरी बसून ब्लूटूथ हेडफोन वापरत अभ्यास करत होते. यावेळी हे हेडफोन्स चार्जिंग प्लगशी जोडलेले होते. गोविंदगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी अचानक हेडफोनमध्ये स्फोट झाला आणि तरुण बेशुद्ध झाला. या घटनेत त्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉ.एल.एन.रुंडला म्हणाले की, सदरील तरुणाला बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा तरुण कदाचित हार्ट फैल झाल्याने मरण पावला असावा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेशचे लग्न याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT