Young farmer in Karnataka attempts to cultivate yellow watermelon
Young farmer in Karnataka attempts to cultivate yellow watermelon  
देश

बाजारात आलेलं पिवळं कलिंगड बघितलं का ? कर्नाटकच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

गोमन्तक वृत्तसेवा

कलबुर्गी : कर्नाटकमधील एक शेतकरी वैज्ञानिकदृष्ट्या पिवळ्या रंगाचे कलिंगड पिकवत आहेत. बसवराज पाटील हे कलबुर्गी कोरल्ली गावातील शेतकरी आहेत, ते पदवीधर आहेत. त्यांनी शहरातील लोकल मार्ट आणि बिग बझार यांच्या सहकार्याने आपले उत्पादन विकण्यास सुरूवात केला आहे. पाटील शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केलेल्या पिवळ्या कलिंगडातून चांगला नफा कमवत आहेत. त्यांनी या कलिंगड उत्पादनात दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली असून आतापर्यंतच्या विक्रीतून एक लाख रुपयांचा नफा कमावला आहे. लाल कलिंगडापेक्षा  पिवळे कलिंगड गोड आहेत असा दावा पाटील यांनी केला आहे. “हे कलिंगड  लाल कलिंगडापेक्षा 
गोड आहेत,” असे त्यांनी एएनआयला सांगितले.

भारतातील तरूण शेचकऱ्यांनी पारंपरिक शेतीपद्धतीचा अवलंब न करता, त्यात विविधता आणली राहिजे, शास्त्राची मदत घेऊन, काही प्रयोग करावेत अशी बसवराज पाटील यांची इच्छा आहे. पिवळ्या कलिंगडाचे बाहेरील आवरण हे लाल कलिंगडाप्रमाणेच हिरव्या रंगाचे आहे, फक्त आतील भाग हा लाल ऐवजी पिवळ्या रंगाचा आहे. यापूर्वी गोव्यातील अभियंतापदावर आलेल्या शेतकऱ्यानेदेखील  पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची  सेंद्रिय पद्धतीने लागवड केली  होती.  नितेश बोरकर यांनी कोणतेही रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर न करता अडीचशेहून अधिक पिवळ्या कलिंगडाची लागवड केली होती. त्यांनी या  शेती प्रकल्पात 4,000 रुपयांची गुंतवणूक केली आणि विक्रीतून 30,000 पेक्षा जास्त उत्पन्न मिळवले.

वैज्ञानिकरित्या सिट्रुल्लस लॅनाटस म्हणून ओळखले जाणारे हे कलिंगड मूळतः आफ्रिकेत पिकवले गेले होते. आज, जगभरात या फळाची लागवड 1,000 पेक्षा जास्त प्रकारांसह केली जाते. पिवळ्या टरबूजमध्ये जीवनसत्त्वे अ आणि सी जास्त प्रमाणात असतात जे रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहे. लाल कलिंगडाच्या तुलनेत,पिवळ्या कलिंगडात जास्त बीटा कॅरोटीन असते, जो एक अँटीऑक्सिडेंट आहे जे कर्करोग आणि डोळ्याच्या आजारापासून बचाव करण्यास मदत करते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT