Yogi Government taken action on Rohingya camp Dainik Gomantak
देश

Yogi Government: रोहिंग्या कॅम्पवर JCB चालवत सरकारी जमीन केली खाली

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या 2.10 हेक्टर क्षेत्रावर बेकायदेशीर रोहिंग्या छावण्या उभारण्यात आल्या.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकार राज्यात कुठेही शासकीय जमिनीवरील अवैध अतिक्रमणाविरूद्ध मोठी मोहीम राबवत असल्याचे पहायला मिळाले आहे. आता सरकारने दिल्लीतील आपली जमीन मोकळी करण्यासाठी बुलडोझर चालवायला सुरू केले आहेत. राज्याच्या योगी आदित्यनाथ सरकारने पोलीस दलासह दिल्लीतील मदनपूर खादर येथील उत्तर प्रदेशच्या पाटबंधारे विभागाच्या 2.10 हेक्टर जागेवर बांधलेली रोहिंग्या छावणी तोडून ती रिकामी केली आहे. या जागेची किंमत तब्बल 150 कोटी रुपये आहे. या जागेवर तयार केलेला रोहिंग्या छावणी सरकारने बुलडोजरने पाडली आहे.

उत्तर प्रदेशच्या पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या 2.10 हेक्टर क्षेत्रावर बेकायदेशीर रोहिंग्या छावण्या उभारण्यात आल्या. RWAने दिल्ली पोलिसांना रोहिंग्या मुस्लिमांची बेकायदा वस्ती दूर करण्याचे आवाहन केले होते पण त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने दिल्लीतील मदनपूर खादर स्मशानभूमीसमोर बेकायदेशीर कामावर कारवाई केली आहे.

दिल्लीकडून येथे सर्व सरकारी सुविधा पुरविल्या जात होत्या. दिल्ली सरकार आणि ओखलाचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी लॉकडाऊनच्या काळात या शिबिरांमध्ये शिधावाटप देखील केला होता. यापूर्वी केंद्र सरकारने स्वत: सर्वोच्च न्यायालयात रोहिंग्या मुस्लिमांपासुन भारताच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT