Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: योगी 2.0 सरकारमध्ये 3 उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता

योगी आदित्यनाथ सरकारचा शपथविधी सोहळा 25 मार्चला पार पडणार होणार आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवल्यानंतर आता शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारचा शपथविधी सोहळा 25 मार्चला पार पडणार होणार आहे. कार्यक्रमाची वेळ दुपारी 4 वाजता असणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी एकना स्टेडियमवरती जय्यत तयारी सुरू आहे. या विशेष सोहळ्यासाठी गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. (Yogi Adityanath will be sworn in as Chief Minister on March 25)

सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाईल. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत 20 मार्चला तीन दिवसांच्या दौऱ्यावरती गोरखपूरला पोहोचणार आहेत. आपल्या तीन दिवसांच्या मुक्कामात संघप्रमुख स्वयंसेवकांची बैठक घेतील. तर मोहन भागवत 22 मार्चच्या रात्री किंवा 23 मार्चच्या सकाळी गोरखपूरहून रवाना होणार आहेत.

यूपीमध्ये सीएम योगी (CM Yogi Adityanath) यांच्या शपथविधी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्याची भाजपची योजना असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात एलईडी स्क्रीन लावून शपथविधी सोहळ्याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. लखनौच्या एकना स्टेडियममध्ये याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते आहे. यूपीमध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपने अमित शहा (Amit Shah) आणि रघुवर दास यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

3 उपमुख्यमंत्री अन् चार डझन मंत्र्यांची शक्यता

योगी 2.0 मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची संभाव्य नावे समोर आली आहेत. यूपीमध्ये 3 देखील उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात. सुमारे 4 डझन मंत्र्यांना (कॅबिनेट, स्वतंत्र दर्जा आणि राज्यमंत्री) शपथ दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नाही तर प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांचाही लौकिक वाढणार असून सुरेश खन्ना यांना देखील विधानसभेचे अध्यक्ष केले जाऊ शकते.

हे नावही चर्चेत असणार आहे

केशव प्रसाद मौर्य, बेबी राणी मौर्य आणि ब्रजेश पाठक उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा होत आहे. तर दिनेश शर्मा, स्वतंत्र देव सिंग, जय प्रताप सिंग, गोपाल टंडन, सिद्धार्थनाथ सिंग, श्रीकांत शर्मा, सूर्य प्रताप शाही, बिपीन वर्मा, संदीप सिंग, धरमपाल लोधी, भूपेंद्र चौधरी, असीम अरुण, राजेश्वर सिंग, रमापती शास्त्री, सतीश महाना यांची मंत्री होण्याची शक्यता आहे.

ते ही पदाची शपथ घेऊ शकतात

याशिवाय आघाडीचे सहकारी आशिष पटेल (अपना दल) आणि संजय निषाद (निषाद पक्ष) यांनाही मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. यावेळी योगी 2.0 मंत्रिमंडळात सर्व जातींना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न असणार आहे. मोहसीन रझा, तेजपाल नागर, वीरेंद्र सिंह, लक्ष्मी नारायण चौधरी, राजेश चौधरी, योगेश धामा, जीएस धर्मेश, अजित पाल त्यागी मंत्री होणार असल्याचीही चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT